काय म्हणाला बापू नायर?
मी पहिल्यांदाच व्यासपीठावर आलोय, काही चुकलं तर समजून घ्या. मला उमेदवारी मिळाल्यानंतर माध्यमांमध्ये नवा ट्रेंड सुरू झाला. पण तुम्हीच सांगा माझ्यासारख्या माणसाने मुख्य प्रवाहात येयचं नाही का? असा मोठा प्रश्न राहतो. सर्वसामान्य लोक म्हणतात, लोकांनी गुन्हेगारी मुक्त झालं पाहिजे. पण जेव्हा माझ्यासारखा माणूस मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा माध्यमं त्याच्या विरोधात का जातात? असा सवाल बापू नायरने यावेळी मंचावरून विचारला.
advertisement
लहान मुलं नशेचे आहारी गेलेत
माझ्या भागातली परिस्थिती मला माहिती आहे. आमच्या भागातील काही घरात चेंबरचं पाणी येतं. घरात नळाला मैलायुक्त पाणी येतंय. कुणाच्या इथं बाहेरच्या लाईट नाहीत, कुठं कॅमेरे नाहीयेत. लहान मुलं नशेचे आहारी गेलेत अन् नेते गब्बर सिंग झालेत. मला संधी मिळालीये तर आता मी काम करून दाखवणार आहे. त्यामुळे आमच्या पॅनेलला तुम्ही निवडणून द्या, अशी अपेक्षा बापू नायरने व्यक्त केली. त्यावेळी अजित पवार यांनी देखील थेट मुद्द्याला हात घातला.
अनेक वर्षांची दिशा ठरवणारी लढाई - अजित पवार
दरम्यान, पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक ही केवळ प्रभागांची निवडणूक नाही, तर पुण्याच्या पुढील अनेक वर्षांची दिशा ठरवणारी लढाई आहे. राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवर चालत आपल्याला सर्वांना मिळून पुण्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे. पुण्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख आहे, पण आज टँकर माफिया, अस्वच्छ प्रभाग, ड्रग्सचं वाढलेलं प्रमाण आणि अल्पवयीन मुलांकडून निर्माण होणारी दहशत हे गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत, असं अजित पवार म्हणाले.
कोण आहे बापू नायर?
केरळमधील वायनाड जिल्ह्यातील एका छोट्या गावातून उदरनिर्वाहासाठी पुण्यात आलेल्या नायर कुटुंबाचा बापू प्रभाकर नायर हा मुलगा. त्याचे वडील पुण्यात स्थायिक झाले आणि बापूने बिबवेवाडी परिसरात आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीच्या काळात तो अत्यंत सामान्य आयुष्य जगत होता. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने काही काळ चारचाकी चालकाचे कामही केले. मात्र, 2001 मध्ये एका मित्रासाठी घेतलेल्या धावपळीत त्याच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आणि बापू नायरच्या आयुष्याची दिशा बदलली. हळूहळू बापूने बिबवेवाडी, धनकवडी आणि कोंढवा भागात आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली. याच काळात त्याचे आणि स्थानिक गुंड बैजू नवघणे यांच्यात वर्चस्वावरून वाद सुरू झाले. 2011 मध्ये एका देवीच्या मिरवणुकीत झालेल्या वादाचा बदला म्हणून बापू नायर टोळीने भरदिवसा बैजू नवघणेचा खून केला. या खुनामुळे पुण्याच्या गुन्हेगारी जगतात बापू नायरचे नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले
