शिळे अन्न खाल्ल्याने पचनसंस्थेवर परिणाम
शिळे अन्न खाल्ल्याने सर्वात आधी पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे पोटाचे विकार सर्वाधिक होतात. पोटात दुखणे, पोटाला मुरडा येणे, जुलाब, उलटी, वारंवार टॉयलेट लागणे अशी लक्षणे दिसून येतात. काही प्रकरणांमध्ये फूड पॉइझनिंग देखील होऊ शकते.
दीड लिटर रक्तस्राव, गर्भवतीची मृत्यूशी झुंज, शेवटी डॉक्टरांनी निर्णय घेतला, 30 मिनिटांत...
advertisement
काही काळानंतर पदार्थातील नैसर्गिक गुण बदलतात
काही काळानंतर कुठल्याही पदार्थातील नैसर्गिक गुण बदलतात. अन्नातील जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स) कमी होतात. प्रथिने आणि खनिजे नष्ट होतात. तेलकट पदार्थांमध्ये दुर्गंधी येते. यामुळे अन्न पौष्टिक न राहता अपायकारक ठरते. शिळ्या अन्नामध्ये बॅक्टेरिया, फंगस आणि इतर सूक्ष्मजीव झपाट्याने वाढतात. विशेषतः भात, आमटी, उसळ, दूध, दही, मांसाहार यामध्ये जंतुसंसर्गाचा धोका अधिक असतो. हे जंतू शरीरात गेल्यास ताप, अंगदुखी, अशक्तपणा जाणवू शकतो.
शिळे अन्न खाल्ल्यास काय त्रास होतो?
लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गरोदर महिला आणि आधीच आजारी असलेल्या लोकांनी शिळे अन्न खाल्ल्यास त्रास अधिक गंभीर होऊ शकतो. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने संसर्ग लवकर होतो. दीर्घकाळ शिळे अन्न खाल्ल्यास पचनशक्ती कमजोर होते. आम्लपित्त, गॅसचा त्रास वाढतो. त्वचेचे विकार उद्भवू शकतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, शक्यतो ताजे आणि गरम अन्नच खावे. उरलेले अन्न योग्य पद्धतीने झाकून ठेवावे. वास, चव किंवा रंग बदललेले अन्न टाळावे. फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न पुन्हा गरम करूनच खावे. चव किंवा वेळ वाचवण्याच्या नादात शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी महागात पडू शकते. त्यामुळे आरोग्य जपण्यासाठी शिळ्या अन्नापासून दूर राहणे आणि ताज्या, पौष्टिक आहाराला प्राधान्य देणे आवश्यक आहे.





