TRENDING:

इनकम नाही… पण 100 कोटींचं साम्राज्य! आंदेकरचा ‘क्राइम एम्पायर’ पाहून पोलिस बुचकळ्यात

Last Updated:

आंदेकरच्या घरातील वस्तू महागड्या असून, किंमतही लाखोंच्या घरात असेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे:  शहरात गँगवॉरच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीविरोधात मोठी कारवाई केली आहे. टोळीयुद्धातून गेल्या महिन्यात आयुष कोमकर या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या खुनप्रकरणी आंदेकर टोळीचा प्रमुख आणि इतर गुंडांना पोलिसांनी अटक केली. या घटनेनंतर पोलिसांनी आंदेकर टोळीची दहशत संपवण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
Bandu Andekar-
Bandu Andekar-
advertisement

आंदेकर टोळीने गेल्या काही वर्षांत शहरात दहशत माजवली होती. खंडणी, दादागिरी, तसेच अवैध धंद्यांच्या माध्यमातून आंदेकरने आपले साम्राज्य उभारले होते. याच अनुषंगाने पुणे पोलिसांनी त्याच्या अवैध उत्पन्नाचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला. चौकशीत आंदेकरकडे उत्पन्नाचा कोणताही अधिकृत स्रोत नसताना शंभर कोटींहून अधिक मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले. यात प्रामुख्याने अनधिकृत मार्केट, सेच परवानगीविना उभारलेली बांधकामे यांचा समावेश आहे.

advertisement

अनधिकृत मालमत्तांवर थेट कारवाई

गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी या अनधिकृत मालमत्तांवर थेट कारवाई सुरू केली आहे. आंदेकर टोळीने उभ्या केलेल्या अनधिकृत मार्केटवर बुलडोझर चालवण्यात आला. तसेच अनेक ठिकाणी उभारलेली बेकायदेशीर बांधकामे पाडण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे आंदेकर टोळीच्या इतर सदस्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

इतर टोळ्यांचे धाबे दणाणले

advertisement

यासह पोलिसांनी आंदेकरच्या संपत्तीबाबत आयकर विभागाला पत्रव्यवहार करून पुढील चौकशीची मागणी केली आहे. उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता कशी उभारली, याचा तपास आयकर विभाग करणार आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे इतर टोळ्यांचे धाबे दणाणले आहे.

आंदेकरच्या घरातील प्रत्येक वस्तू मोजणार

आंदेकरची बँक खाती गोठवल्यानंतर आंदेकरच्या घरातील प्रत्येक वस्तूची मोजदाद करून मूल्य निश्चित

advertisement

केले जाणार आहे. आंदेकरच्या घरातील वस्तू महागड्या असून, किंमतही लाखोंच्या घरात असेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याद्वारे पोलिस आंदेकरची बेहिशेबी मालमत्ता अधोरेखित करणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

गुन्हेगारीविरोधात पोलिसांची ठाम भूमिका

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
यंदा 6 की 7 ऑक्टोबर कधी आहे कोजागिरी पौर्णिमा? पूजा विधी आणि संपूर्ण माहिती
सर्व पहा

पोलिस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे की, गुन्हेगारीतून उभारलेलं साम्राज्य संपवण्यासाठी अशा टोळ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील. आंदेकर प्रकरणामुळे शहरात गुन्हेगारीविरोधात पोलिसांची ठाम भूमिका अधोरेखित झाली आहे

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
इनकम नाही… पण 100 कोटींचं साम्राज्य! आंदेकरचा ‘क्राइम एम्पायर’ पाहून पोलिस बुचकळ्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल