मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका
वसंत मोरे यांनी ट्विटरवर पोस्ट करत मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली. वसंत मोरे यांनी पुण्यात झालेल्या ड्रोन शोसाठी झालेला खर्च काढण्यासाठी त्याच कंपनीकडून कोटेशन मागवून घेतलं. त्यावेळी हे कोटेशन एक कोटी रुपये होतं. त्यानंतर वसंत मोरेंनी मंत्रिमहोदयांना पुण्यातील ससून रुग्णालयाची आठवण करून दिली आणि हवेत उडणाऱ्यांनी जमिनीवर यावं असा सल्ला देखील दिला.
advertisement
Pune Crime : पुण्यात 'देवा'साठी सासूने सुनेला कोर्टात खेचलं, घटस्थापनेआधी मिळाला न्याय!
नेमकं काय म्हणाले वसंत मोरे?
परवाच्या दिवशी पुण्यात ड्रोन शो झाला. आपण म्हटलं कंपनीला विचारावं किती खर्च येतो, कंपनीने हे कोटेशन दिले आहे. 1000 ड्रोन आकाशात अर्धा तास उडविण्यासाठी एक कोटी रुपये घेतो. बापरे.... या एक कोटी रुपयांमध्ये आमच्या पुण्यातील ससून रुग्णालयाचे किती काम झाले असते तेव्हा हवेत उडणाऱ्यांनी थोडं जमिनीवरही लक्ष द्यावं, असं वसंत मोरे म्हणाले आहेत. विचार पुणेकरांनो तुम्हाला करायचा आहे, असंही वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.
महापालिका निवडणुकीची तयारी?
दरम्यान, आगामी जानेवारी महिन्याच्या अखेरीस महापालिका संपन्न होणार आहेत. अशातच आता पुणे महापालिकेसाठी देखील मोठी फाईट पहायला मिळत आहे. वसंत मोरे यांच्यावर ठाकरे गटाने मोठी जबाबदारी सोपवली असल्याने आता वसंत मोरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे.