रिक्षाचालक शोभा घंटे या सोलापूर शहरातील म्हेत्रे वस्ती येथे वास्तव्याला आहेत. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांचे पती एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होते. पतीच्या पगारावर घर कसं चालणार? मुलांचं शिक्षण कसं होणार? हा प्रश्न शोभा यांना नेहमी पडत होता. म्हणून त्यांनी पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करायचा निर्णय घेतला आणि रिक्षाचालक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला.
advertisement
Navratri 2025: चौकाचौकात घडणार अंबाबाईचं दर्शन! कसा आहे कोल्हापूर देवस्थानचा विशेष उपक्रम ?
शोभा यांनी एका खासगी ड्रायव्हिंग स्कूलमधून चालक होण्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं. 2018 मध्ये एका बँकेतून कर्ज घेऊन त्यांनी रिक्षा खरेदी केले आणि आपलं काम जोमान सुरू केलं. दोन वर्षांपूर्वी शोभा घंटे यांच्या पतीचं निधन झालं. पतीचा आधार गेल्यानंतर कोणतीही स्त्री मानसिकदृष्ट्या खचते. मात्र, शोभा यांनी त्यावर मात केली. आपल्या मुलाला मोठ्या अधिकारी पदावर पोहोचवण्यासाठी त्यांनी आता कायमस्वरूपी रिक्षाचं स्टिअरिंग हाती घेतलं.
लग्नापूर्वी शोभा घंटे यांना पोलीस दलात भरती व्हायचं होतं. पोलीस भरतीसाठी त्यांनी अनेकदा प्रयत्नही केले होते. पण, उंची कमी असल्याने त्या भरती होऊ शकल्या नाही. 2007 पासून त्या होमगार्ड देखील आहेत. सध्या रिक्षाचालकाचाही हा होईना पण, खाकी वर्दी परिधान करून त्या सोलापुरात रिक्षाचालवत आहेत. प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित पोहोचवण्याचं काम त्या करत आहेत. अनेक प्रवासी शोभा घंटे यांच्याशी समोरून संपर्क साधतात आणि त्यांच्या रिक्षातून प्रवास करतात.