अंतरिम जामीन मंजूर
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येतेय. आरोपी अल्पवयीन तरुणाच्या आईला जामीन मंजूर करण्यात आलाय. तरुणाचे रक्त बदलल्या प्रकरणी आई शिवानी अगरवाल यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. गेल्या 10 महिन्यापासून आरोपी तरुणाची आई जेलमध्ये होती. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला असून अनेक अटी शर्तीवर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
advertisement
पोलीस ठाण्यात हजर रहाणं बंधनकारक
शिवानी अगरवालला दर बुधवारी 11 ते 1 या वेळेत येरवडा पोलीस ठाण्यात हजर रहाणं बंधनकारक असणार आहे. शिवानी अगरवालला स्वतःच्या मोबाईलच लोकेशन सतत सुरू ठेवणं देखील बंधनकारक असेल. पोलिसांनी पासपोर्ट देखील जप्त केला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शिवानी अग्रवाल यांना दर बुधवारी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावं लागणार आहे.
दरम्यान, याप्रकरणात घटना घडून गेल्यानंतर रात्री उशिरा एका तासात आमदार सुनील टिंगरे यांनी पोलिस स्टेशनला भेट दिली होती. पोलिसांवर कोणताही दबाव टाकण्यासाठी मी गेलो नसल्याचे आमदार टिंगरे यांनी सांगितलं होतं. मात्र, टिंगरेंच्या उपस्थितीमुळे मोठे प्रश्न उपस्थित केले जात होते.
