प्रक्रिया का आवश्यक आहे?
अनेक गुन्हेगार किंवा बेघर व्यक्ती खोटी ओळख देऊन फ्लॅट भाड्याने घेतात. यामुळे गुन्हेगारी वाढू शकते. पोलिसांना वेळेत माहिती न दिल्यास तपासात अडथळे निर्माण होतात आणि काही प्रकरणांमध्ये घरमालक जबाबदार धरला जातो. त्यामुळे भाडेकरूंच्या माहितीची नोंदणी ही कायद्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षिततेसाठी आवश्यक पाऊल ठरते.
MHADA ची बंपर लॉटरी! पुणे, सोलापूरसह या शहरांमध्ये मिळेल स्वस्तात घर, लगेच करा अर्ज
advertisement
माहिती न दिल्यास कारवाई होणार
जर घरमालकाने पोलिसांना भाडेकरूविषयी माहिती दिली नाही तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. भारतीय दंडसंहितेनुसार तसेच स्थानिक पोलिस कायद्याअंतर्गत चुकीची माहिती दिल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी या प्रक्रियेत कोणतीही टाळाटाळ न करता भाडेकरूंची माहिती नोंदवणे महत्त्वाचे ठरत आहे.
अधिकृत भाडे करार करणे गरजेचे
घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील स्पष्ट करार, अधिकृत कागदपत्र आणि पोलिस ठाण्यातील नोंदणी यामुळे पुढील काळात कोणतेही वाद उद्भवल्यास संरक्षण मिळते. तसेच या नियमांचे पालन केल्यास दहशतवादी हालचाली किंवा इतर गुन्हेगारी प्रकारांवर अंकुश ठेवता येतो.