सारसबागच्या कार्यक्रमाला गालगोट
पुण्यात दिवाळी पाडवा पहाटचा उत्सव सारसबागेत आयोजित केला जातो. मात्र, यंदाच्या वर्षी सारसबागेत दोन गटात वाद पेटल्याचं पहायला मिळालं. कार्यक्रमावेळी राडा झाला. त्यामुळे सारसबागच्या दिवाळी पहाटच्या अभूतपूर्व कार्यक्रमाला गालगोट लागल्याचं चित्र यंदा पहिल्यांदाच पहायला मिळालं आहे. त्याचा व्हिडीओ देखील सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.
धक्का लागल्याने दोन गटात हाणामारी
advertisement
पोलिसांकडून सतर्कता बाळगण्याचे आश्वासन दिल्यानंतर आयोजकांकडून कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला होता. तर सारसबागेच्या बाहेर पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. एकमेकांना धक्का लागल्याने दोन गटात हाणामारी झाली. मात्र, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रकरण मिटवलं. चार ते पाच जणांकडून एकमेकांना शिवीगाळ आणि मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.
पाहा Video
दरम्यान, आमचा दिवाळी पहाट कार्यक्रमाला विरोध नाही मात्र त्या कार्यक्रमात घुसणाऱ्या जिहद्दी व्यक्तीच्या लोकांना विरोध आहे. त्यासाठी आम्ही हिंदूंना इकडे येण्याचा आवहान केला आहे .उद्या आम्ही कार्यक्रम सहभागी होणार आणि जर काही चुकीचे झालं तर आमच्या पद्धतीने आम्ही कारवाई करणार असा इशारा हिंदू संघटनांनी दिला होता.
