वाहतुकीसाठी हे रस्ते राहणार बंद: सोमवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत शहरातील वर्दळीचे मार्ग जसे की, फर्ग्युसन महाविद्यालय (FC) रस्ता, गणेशखिंड रोड, जंगली महाराज (JM) रस्ता आणि या मार्गांना जोडणारे सर्व उपरस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहतील.
Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा येणार हिम लाट, या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट
advertisement
कुठे असेल सुट्टी?
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, पुणे महापालिकेच्या खालील क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी असेल: शिवाजीनगर-घोले रोड, विश्रामबागवाडा-कसबा, ढोले-पाटील रोड, भवानी पेठ, औंध-बाणेर, कोथरूड-बावधन, सिंहगड रोड आणि वारजे-कर्वेनगर. या शाळांमध्ये सर्व अंगणवाड्या, शासकीय व खासगी प्राथमिक-माध्यमिक शाळा, आश्रमशाळा, व्यावसायिक शिक्षण संस्था (ITI) आणि महाविद्यालयांचा समावेश आहे.
१९ ते २३ जानेवारी दरम्यान चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत अनेक विदेशी खेळाडू सहभागी होत आहेत. या स्पर्धेमुळे पुण्याच्या क्रीडा वैभवात भर पडणार असली, तरी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या सुट्टीच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल
या सायकल स्पर्धेमुळे पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. नागरिक जहांगीर चौक, आरटीओ रस्ता, बोलई चौक, मालधक्का चौक या मार्गांचा वापर करून आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकतात, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच गरज नसल्यास खासगी वाहनांचा वापर टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
