पुणे : आपल्या मुलांप्रमाणे झाडांची काळजी घेऊन आलेली फळे खायला मिळणं हा आनंद काही वेगळाच आहे. पुण्यातील चिंचवड या ठिकाणच्या शंकर पाटील यांनी आपल्या घराच्या गच्चीवर बाग फुलवली आहे. त्यामुळे त्यांना स्वतः पिकवलेली फळे आणि भाजीपाला खायला मिळत आहे.
मूळचे जळगाव जिल्ह्यातील असलेल्या आणि सध्या वास्तव्यास चिंचवड या ठिकाणी असलेल्या शंकर पाटील यांनी शहरातील मर्यादित जागेत देखील बाग होऊ शकते हे दाखवून दिलंय. त्यांच्या या बाहेत मोसंबी, अंजीर, पेरू, सीताफळ, डाळिंब, द्राक्ष, स्टॉबेरी, पेरू, चिक्कू, अशी फळं असून पालेभाज्यमध्ये कढीपत्ता, मेथी, पालक, गवार, पुदिना, कोथिंबीर लावली आहे.
advertisement
फक्त 59 रुपयांत फळविक्रेता झाला करोडपती, कोल्हापूरच्या शुभमनं कशी केली कमाल?
शंकर पाटील यांनी टेरेस बागकामासाठी काही खास तंत्रे वापरली. त्यांनी उंच आणि खोल नसलेल्या कुंड्या वापरल्या जेणेकरून जागेचा जास्तीत जास्त वापर करता येईल. कीटक नियंत्रणासाठी नैसर्गिक पद्धती अवलंबवून त्यांनी जैविक खताचा वापर करून बागेची सुपीकता टिकवून ठेवली. बागकामासाठी योग्य ती माती आणि खत वापरले.
टेरेस बागेविषयी माहिती देताना शंकर पाटील यांनी सांगितले की, विविध रंगीबेरंगी फुलांनी आणि रसाळ फळांनी मी टेरेस बाग एका सुंदर बागेत बदलली. या टेरेस बागेची खूप काळजी घेवून नियमितपणे बागेला पाणी मी देत असतो. स्वतः सेंद्रिय खत तयार करून खत टाकत कीटकांपासून बागेचे रक्षण केले. या मेहनतीचे फळ लवकरच मिळू लागले. बागेत फळे आणि भाजीपाला खूप चविष्ट आणि रसाळ येऊ लागली.
पारंपरिक पीक पद्धतीला दिली बगल; भाजीपाला शेतीतून बांधला 20 लाखांचा बंगला, Video
शंकर पाटील यांची टेरेस बाग इतर लोकांसाठी प्रेरणादायी आहे. शहरी भागात राहणाऱ्या लोकांसाठी टेरेस बागायती हा उत्तम पर्याय आहे. टेरेस बागायतीमुळे ताजी आणि स्वच्छ फळे आणि भाजीपाला मिळते तसेच, घराचे वातावरण प्रसन्न आणि आनंददायी बनते, असं शंकर पाटील यांनी म्हटलं.





