पारंपरिक पीक पद्धतीला दिली बगल; भाजीपाला शेतीतून बांधला 20 लाखांचा बंगला, Video

Last Updated:

शेतकऱ्याला पिकवता येतं पण विकता येत नाही, असं म्हटलं जातं. पण सोलापूर जिल्ह्यातील कामतीचे शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर याला अपवाद आहेत.

+
पारंपरिक

पारंपरिक पीक पद्धतीला दिली बगल; भाजीपाला शेतीतून बांधला 20 लाखांचा बंगला, Video

प्रसाद दिवाणजी, प्रतिनिधी
सोलापूर : पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत काही शेतकरी आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करत आहेत. शेतकऱ्याला पिकवता येतं पण विकता येत नाही, असं म्हटलं जातं. बळीराजाला त्याच्या मालाचा योग्य भाव मिळत नाही. याबाबत नेहमीच खंत व्यक्त केली जाते. पण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक शेतकरी याला अपवाद आहेत. कामती येथील प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर आत्माराम हिप्परकर हे भाजीपाल्याची शेती करतात. हा भाजीपाला स्थानिक बाजारपेठांमध्ये विकून ते लाखोंची कमाई करत आहेत.
advertisement
पारंपरिक पिके घेतल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यात वाढ होण्यासाठी नवनवीन कृषी तंत्रांचा, यांत्रिकीकरणाचा पर्याय उपलब्ध करणे गरजेचे आहे. शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी पारंपरिक पिकांना बगल देत भाजीपाला शेती करुन आर्थिक उन्नती साधली आहे. भाजीपाला शेतीतून त्यांना आतापर्यंत लाखोंचं उत्पन्न मिळाले आहे.
advertisement
सेंद्रीय भाजीपाल्याची शेती
"सेंद्रिय भाजीपाला असल्याने नागरिक आमच्याकडून भाजी घेतात. एकूण 15 प्रकारांची पिके आम्ही घेतो. आम्ही पिके घेत असताना एकच पीक एकरभर असं करत नाही. कारण एकरावर पिके घेतली तर विकण्यासाठी मार्केट यार्डला जावे लागते. तिथे हवा तसा भाव मिळत नाही. म्हणून आम्ही सर्व भाजीपाला हात विक्री करतो. केमिकल पीक खाल्याने माणसांनमध्ये आजारपणाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे सर्वांनी सेंद्रिय भाजीपाला खावा त्याने शरीर निरोगी राहील," असेही हिप्परकर सांगतात.
advertisement
भाजीपाला शेतीतून लखपती
ज्ञानेश्वर यांनी भाजीपाला लागवडीतून आतापर्यंत वांगी पिकातून एक लाख 12 हजार रुपये, दोडका शेतीतून दीड लाख, तर टोमॅटो पिकातून दीड लाखाचे उत्पन्न घेतले. त्यामुळे खर्च वगळता त्यांना अडीच लाख रुपयांचे निव्वळ उत्पादन झाले आहे. खेडोपाडी जाऊन ते स्वत:च कांदे, टोमॅटो, वांगी, पालक आणि इतर भाजीपाल्याची विक्री करतात. त्या भाजीपाला विक्रीतून त्यांना चांगला नफा मिळत असल्याचे हिप्परकर सांगतात.
advertisement
शेतीवर बांधला बंगला
"आमचं 15 लोकांचं कुटुंब आहे. आमचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो. वर्षाला आम्ही 8 एकर शेतीतून तब्बल 15 ते 20 लाखांचे भाजीपाला उत्पन्न घतो. त्यामुळे आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थिपणे होतो. आम्ही यात खूप खुश आहे. आम्हाला कशाची कमतरता भासत नाही. आम्ही या भाजीपाला शेतीतून 20 लाखांचा बंगला बांधला आहे. आमचा सर्व परिवार येथे आंनदाने नांदतो," अशी भावना शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
पारंपरिक पीक पद्धतीला दिली बगल; भाजीपाला शेतीतून बांधला 20 लाखांचा बंगला, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement