फक्त 20 गुंठ्यात आल्याची लागवड अन् घेतलं भरघोस उत्पन्न, सांगलीच्या शेतकऱ्याची प्रेरणादायी गोष्ट!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
या आल्याच्या शेतीमधून एक गुंठा क्षेत्रामध्ये सुमारे 400 ते 500 किलो उत्पन्न शेतकऱ्याला अपेक्षित असते. मात्र, सचिन कदम यांनी एक वेगळीच किमया करून दाखवली आहे.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सांगली : अनेक शेतकरी आता पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेतीकडे वळत आहे. विशेष म्हणजे यातून अनेक शेतकरी हे चांगला नफा कमावताना दिसत आहेत. आज अशाच एका यशस्वी शेतकऱ्याबाबत आपण जाणून घेऊयात, ज्यांनी कमी क्षेत्रामध्ये योग्य व्यवस्थापन करत लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे.
सचिन परशुराम कदम असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक येथील रहिवासी आहेत. मागील 13 वर्षांपासून सचिन कदम हे आल्याची शेती करत आहेत.
advertisement
यादरम्यान, मागच्या एक वर्षांपूर्वी त्यांनी 20 गुंठे क्षेत्रामध्ये आल्याची लागवड केली आहे. या आल्याच्या शेतीमधून एक गुंठा क्षेत्रामध्ये सुमारे 400 ते 500 किलो उत्पन्न शेतकऱ्याला अपेक्षित असते. मात्र, सचिन कदम यांनी एक वेगळीच किमया करून दाखवली आहे. त्यांनी एक गुंठे क्षेत्रामधून आल्याचे तब्बल 900 ते 1000 किलो उत्पादन घेतले आहे. तसेच संपूर्ण 20 गुंठे क्षेत्रामधून 19 ते 20 टन आल्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.
advertisement
काय म्हणाले शेतकरी सचिन कदम -
याबाबत लोकल18 च्या टीमने शेतकरी सचिन कदम यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, आल्याच्या शेतीचा संपूर्ण अभ्यास, शेतीची मशागत, सेंद्रिय खतांचा वापर, शेताला वेळेवर पाणी आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर अशक्य गोष्ट शक्य करता येते. त्याचबरोबर आल्याच्या शेतीसाठी शेणखतांचा वापर, उसाच्या कारखान्याची मळीचा वापर, कारखान्याची राख, आठ दिवसातून कीटकनाशकांची फवारणी, आल्याला बुरशी लागू नये यासाठी फवारणी करणे महत्त्वाचे आहे.
advertisement
त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही काम केले. यासाठी सुरुवातीला 2 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यात आता 10 पटीने जास्त उत्पन्न या 20 गुंठे आल्याच्या शेतीतून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
view commentsLocation :
Satara,Maharashtra
First Published :
March 22, 2024 9:47 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
फक्त 20 गुंठ्यात आल्याची लागवड अन् घेतलं भरघोस उत्पन्न, सांगलीच्या शेतकऱ्याची प्रेरणादायी गोष्ट!

