पुणे : आपल्याकडे असणाऱ्या अफाट बुद्धीमतेने अनेक जण हे आपलं नाव वेगवेगळ्या रेकॉर्डच्या माध्यमातून नोंदवत असतात. त्यामध्ये अगदी लहान मुलं ही आपल्याला पाहिला मिळतात. पुण्यातील शिवांश नाथ या चिमुकल्याने स्वतःचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आयबीआर अचिव्हर म्हणून नोंदविले आहे. त्याने 218 फ्लॅश कार्डस कमी वयामध्ये अचूक पणे ओळखले आहेत.
advertisement
218 फ्लॅश कार्डसची अचूक ओळख
पुण्यातील धानोरी परिसरात राहणारा शिवांश नाथ अवघा 1 वर्ष 10 महिन्याचा असून 218 फ्लॅश कार्डस अचूक ओळखतो. यामध्ये आकृती, फळं, पक्षी, प्राणी, कार लोगो, फुल, मसाले, श्वान प्रकार, नृत्य, अवकाशातील ग्रह, शास्त्रज्ञ आणि वेगवेगळ्या प्रकारचे पझल सोडवतो.
यामध्ये 12 आकृती, 17 फळे, 10 पक्षी, 14 प्राणी, 20 श्वान प्रकार, 30 कार लोगो, 15 मसाले, 15 फुले, 12 देव, 15 वाद्य प्रकार, 10 शरीराचे अंतर्गत अवयव, 10 नृत्य प्रकार, 10 अवकाशातील ग्रह, 26 इंग्रजीमधील मुळाक्षरे आणि 1 ते 10 अंक याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त शिवांश 21 देशांचे ध्वज, 20 प्रकारची दळणवळणची साधने तसेच देशभक्त, शास्त्रज्ञ तो ओळखतो.
21 वर्षांची तरुणी झाली मेकअप गुरू, स्वतःच्या हिंमतीवर सुरू केला मेकअप स्टुडिओ
शिवांशने हा रेकॉर्ड केला तेव्हा तो 1 वर्ष 10 महिन्याचा होता. वेगवेगळे फ्लॅश कार्ड ओळखतो म्हणून त्याला हे मेडलं आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून आयबीआर अचिव्हर म्हणून सर्टिफिकेट देखील मिळालं आहे. या फ्लॅश कार्डमध्ये डॉग ब्रिड्स, फळं, प्राणी, पक्षी, आकृत्या, शरीराचे अंतर्गत अवयव असे तो 218 फ्लॅश कार्ड हे ओळखत होता. परंतु आता तो जवळपास 500 हुन अधिक फ्लॅश कार्ड हे ओळखतो. त्याला टीव्ही आणि मोबाईल पासून लांब ठेवण्यासाठी हे दाखवायला सुरुवात केली. त्यामध्ये चित्र असल्यामुळे तो आवडीने बघतो. आतापर्यंत असं माहीत नव्हते रेकॉर्ड करता येतो. पण आता माहीत झाल्यामुळे जास्तीत जास्त फ्लॅश कार्ड ओळख असा रेकॉर्ड त्याच्या नावाने झाला पाहिजे अशी इच्छा आहे, अशा भावना शिवांशची आई स्वाती नाथ यांनी व्यक्त केली आहे.