अमन विधाते हे मुंबईतले कलाकार यंदा राम मंदिराचा देखावा तयार करत आहेत. लोखंडी फ्रेम त्यावर फायबर आकर्षक विद्युत रोषणा याचा वापर करून मंदिर तयार होत आहे. ते हुबेहूब करण्याचा अमन यांचा प्रयत्न आहे प्रतिकृतीच्या समोरच्या बाजूस तयार करण्यात येणारा रामसेतू पुण्यात यावेळी फारच गाजेल असा विश्वास कलाकारांनी व्यक्त केला. देखाव्यापासून पुढे चौकाकडे रस्त्याच्या मध्यभागातून असा हा सेतू तयार करण्यात येणार आहे.
advertisement
गणेशोत्सवात बाप्पाला काय नैवेद्य दाखवावा? जाणून घ्या शास्त्र
या मंदिराच्या सजावटीसाठी यंदा मुंबई, कऱ्हाड, हैदरबाद अशा वेगवेगळ्या भागातले साडेचारशेरेक्षा जास्त कामगार काम करत आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंडळानं यंदा प्रथमच हे काम पुण्याच्या बाहेरच्या कलाकारांवर सोपवलंय. मंडळाची आजवरची पंरपरा पुढे नेणारा हा देखावा असेल, असा विश्वास कलाकारांनी व्यक्त केलाय.
मूळ मंदिराप्रमाणेच त्यावरही आकर्षक शिल्पाकृती असतील. मंदिराच्या गुंठावर दशावतार तसेच भगवान सत्यनारायण आणि विठ्ठल यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारण्यात येणार आहेत. गणेश पुराणातील अनेकदृश्य मंदिराच्या भिंतीवर उठावशिल्पांच्या माध्यमातून दाखवण्यात येतील. रामरायांच्या स्वागतासाठी म्हणून मंदिरांच्या दोन्ही बाजूंना वानर उभे असल्याचा देखावाही यंदा करण्यात येणार आहे.