TRENDING:

Pune Travels Rates : ऐन दिवाळीत खासगी ट्रॅव्हलचे भाडे विमानापेक्षा जास्त; पुणे-जळगाव प्रवाशांची आर्थिक कोंडी

Last Updated:

Private Bus Overcharging : दिवाळीत पुणे-जळगाव मार्गावरील प्रवाशांना तिप्पट बस भाड्याचा मोठा फटका बसत आहे. एसटी आणि रेल्वेचे तिकीट फुल्ल असल्याने खासगी बसचालक मनमानी दर आकारून प्रवाशांची अक्षरशः लूट करत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत असून प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : दिवाळीच्या सणाच्या काळात पुण्यातून गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली आहे. पुणे ते जळगावच्या मार्गावर चालणाऱ्या खासगी ट्रॅव्हल कंपन्यांनी तिकीटांचे दर दुप्पट ते तिप्पट करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रवाशांना या दिवाळीत प्रवासासाठी जास्त खर्च करावा लागतो ज्यामुळे त्यांच्या खिशावर मोठा ताण पडला आहे.
News18
News18
advertisement

21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजनाच्या मुख्य दिवशी या मार्गावर ट्रॅव्हल्सचे तिकीट 1134 ते 299 रुपयांपर्यंत पोहोचले. तर 22 ऑक्टोबरला देखील तिकीटांचे दर 1399 ते 2000 रुपयांपर्यंत राहिले. सध्या पुणे-जळगाव मार्गावर चालणाऱ्या सुमारे 10 रेल्वे गाड्यांनाही प्रचंड वेटिंग लिस्ट आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी पर्याय खूप कमी मिळत आहेत.

रेल्वे भरले असल्यामुळे लोकांना खासगी ट्रॅव्हल्स किंवा विमानसेवेचा अवलंब करावा लागत आहे. यामुळे सामान्य प्रवाशांचे आर्थिक ओझे वाढले आहे. अनेकांना सणासुदीत गावी जाण्यासाठी तिप्पट भाडे भरावे लागले आहे. प्रवाशांचा अनुभव काहीसा त्रासदायक ठरला आहे कारण सणाच्या उत्साहातही प्रवासाचा खर्च जास्त असल्याने आर्थिक ताण वाढला आहे.

advertisement

विशेषतहा कुटुंबांसाठी हा खर्च मोठा ओझ ठरत आहे. काही लोकांसाठी तर हा प्रवास महाग असल्यामुळे पर्याय कमी असल्याने त्यांनी ट्रॅव्हल्स किंवा फ्लाइट बुक करणे भाग पडले आहे. प्रवाशांना फक्त सण साजरा करण्यासाठी नव्हे तर प्रवासासाठीही अधिक पैसे खर्च करावे लागतात.

तसेच या काळात खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या जास्त भाडे घेऊन प्रवाशांचा फायदा घेत आहेत. प्रवाशांना हायमध्यम उत्पन्न असलेल्या लोकांसाठी हा एक मोठा आर्थिक अडथळा ठरत आहे. रेल्वे आणि बसच्या मर्यादांमुळे लोकांना या महागड्या ट्रॅव्हल्सवर अवलंबून रहावे लागते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोनं महागलंय, दिवाळीत घ्या हटके अन् स्टायलिश ज्वेलरी, किंमत फक्त 145 रुपयांपासून
सर्व पहा

या सर्व कारणांमुळे दिवाळीच्या सणाच्या काळात पुणे-जळगाव प्रवाशांसाठी प्रवास महाग आणि कठीण झालेला आहे. प्रवाशांना वेळेवर गावी पोहोचण्यासाठी तिप्पट भाडे देऊन खासगी ट्रॅव्हल्स किंवा विमानसेवा निवडावी लागत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर प्रवासाचा खर्च वाढत आहे आणि प्रवाशांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune Travels Rates : ऐन दिवाळीत खासगी ट्रॅव्हलचे भाडे विमानापेक्षा जास्त; पुणे-जळगाव प्रवाशांची आर्थिक कोंडी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल