नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 11 जानेवारी रोजी घडली. नीलेशच्या वडिलांनी त्याचा आत्याचा मुलगा हरिभाऊ यादव यांना फोन करून नीलेश काय करत आहे, याची विचारपूस करण्यास सांगितलं होतं. त्यांच्या सांगण्यावरून हरिभाऊ जेव्हा नीलेशच्या घरी पोहोचले, तेव्हा घराचा दरवाजा उघडून पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. नीलेशने नायलॉनच्या दोरीने घराच्या छताला गळफांस घेतल्याचं त्यांना आढळून आलं.
advertisement
विवाहिता एकटी असल्याचा घेतला फायदा; दोघं भाऊ घरात घुसले अन् नको ते केलं, आता घडली अद्दल
या घटनेनंतर लक्ष्मण रामभाऊ यादव यांनी तातडीने राजगड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. नीलेश हा अवघ्या २३ वर्षांचा होता, अशा तरुण वयात त्याने आत्महत्या का केली? याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट पोलिसांना सापडलेली नाही.
राजगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मांडके या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. नीलेशच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांकडून माहिती घेऊन आत्महत्येमागील नेमकं कारण शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. ऐन उमेदीच्या काळात एका तरुणाने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने सुरवड गावात दुःख व्यक्त होत आहे.
