जाग्यामोहोळ म्हणत धंगेकरांची टीका
जाग्यामोहोळ म्हणत रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली होती. पुण्यातील जागा खाणारं जाग्यामोहोळ, असं धंगेकर म्हणाले होते. त्यानंतर आता शनिवारवाड्याचा मुद्दा समोर आल्यानंतर धंगेकर यांनी पुन्हा एकदा ट्विट करत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
काय म्हणाले धंगेकर?
ते वेगवेगळे विषय काढून लक्ष विचलित करतील, आपण मात्र Save HND या मुद्द्यावर ठाम राहायचं. समस्त पुणेकर सगळ्या जैन समाजाच्या सोबत आहे, असं रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत. कारण आज वेळ जैन समाजावर आली आहे. याकाळात आपण एकत्र नाही आलो तर उद्या सर्वांची धार्मिकस्थळे अशीच लाटली जातील, अशी भीती देखील धंगेकरांनी यावेळी व्यक्त केली. I Repeat, एकही वीट हलवू द्यायची नाही, असं म्हणत धंगेकरांनी निश्चय व्यक्त केलाय.
मुरलीधर मोहोळ यांना चिमटा
दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत अर्धा तास बडबड केली. परंतु, एकदाही जैन मंदिर वाचलं पाहिजे असं म्हणाले नाहीत. कारण त्यांना त्यांचा व्यावसायिक भागीदार महत्त्वाचा आहे आणि त्यावरील मलिदा खायचा आहे, असं म्हणत धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांना चिमटा काढला आहे. आज पुणेकर म्हणून दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की आमच्या खासदाराच्या व्यावसायिक भागीदाराने जैन मंदिर बँकेत गहाण ठेवून ७० कोटी रुपये कर्ज घेतलं, असंही धंगेकर म्हणाले.