बीएच नंबरची सुविधा मिळवलेल्या वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची अट आहे. बीएच नंबरच्या वाहनांसाठी दर दोन वर्षांनी रोड टॅक्स भरणे अनिवार्य आहे. जर वाहनधारकांनी ठराविक वेळेत कर भरला नाही, तर दंडाची तरतूद करण्यात आली आहे. कर न भरल्यास सात दिवसांनंतर दररोज 100 रुपये दंड आकारला जातो. म्हणजेच एका वर्षात कर न भरल्यास तब्बल 36 हजार रुपये दंड भरावा लागतो.
advertisement
200 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर यश मिळालं; पुण्यातील 'या' प्रसिद्ध भागाचे नाव बदलले
बीएच नंबर असलेल्या वाहनांचा कर दोन वर्षांसाठी नेमून दिलेला असतो. हा कर संपल्यानंतर वेळेत कर न भरल्यास संबंधित वाहनधारकाला मोठा आर्थिक फटका बसतो. त्यामुळे सर्व वाहन मालकांनी दोन वर्षांनंतर कराची ऑनलाइन नोंदणी करून वेळेत भरणा करावा, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
नंबरसाठी निकष काय?
बीएच सिरीज मिळवण्यासाठी ठराविक निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. केंद्र किंवा राज्य सरकारचे कर्मचारी, बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी, खासगी क्षेत्रातील अशा संस्था ज्यांची कार्यालये किमान चार राज्यांमध्ये आहेत अशांना ही सुविधा उपलब्ध आहे.
देशभरात कुठेही वाहन चालवण्याची मुभा
बीएच नंबर सिरीज असलेले वाहन देशभरात कुठेही चालवता येते. एकाच राज्यापुरते ते मर्यादित राहत नाही. त्यामुळे अशा वाहनांचा वापर करणाऱ्या धारकांना वारंवार नोंदणी प्रक्रियेतून जावे लागत नाही. पुण्यातही बीएच नंबर असलेल्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वाहन धारकांसाठी ही मोठी सुविधा असली तरी, वेळेवर कर भरणे टाळल्यास होणारा दंड टाळण्यासाठी दक्ष राहणे आवश्यक असल्याचे परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले.