TRENDING:

पिकअपमध्ये बसून यायचे अन् मध्यरात्रीच करायचे धक्कादायक कांड, पुण्यातील त्या 5 घटनांनंतर अखेर टोळीला अटक

Last Updated:

शिरूर तालुक्यातील खैरेनगर आणि केंदूर परिसरात पिकअप वाहनातून येऊन, घराचे दरवाजे तोडून ज्येष्ठ नागरिकांना मारहाण करणाऱ्या एका सराईत दरोडेखोर टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : शिरूर तालुक्यातील खैरेनगर आणि केंदूर परिसरात पिकअप वाहनातून येऊन, घराचे दरवाजे तोडून ज्येष्ठ नागरिकांना मारहाण करणाऱ्या एका सराईत दरोडेखोर टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि शिक्रापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत टोळीतील मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दरोड्याचे २ आणि जबरी चोरीचे ३ असे एकूण ५ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
सराईत दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश (प्रतिकात्मक फोटो)
सराईत दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

अशी झाली अटक

अटक करण्यात आलेल्यांमध्ये अनिरुद्ध किरण भोसले (वय ३०, रा. बीड), निकेश रोहिदास काळे (वय ३०, रा. शिरूर) आणि विकी संजय काळे (वय ३०, रा. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे. या टोळीने ८ फेब्रुवारी २०२६ रोजी खैरेनगर येथे बाळू खैरे आणि सुनील खैरे यांच्या घरावर दरोडा टाकला होता. यावेळी आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून आणि काठीने मारहाण करून सुमारे ४ लाख ४ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटली होती.

advertisement

पुणे-मुंबई प्रवास आता सुसाट! नव्या पर्यायी मार्गाला मंजुरी; लोणावळा-खंडाळ्याचा घाट विसरा, 'या' मार्गाने वाचणार वेळ

या टोळीत एकूण ६ जणांचा समावेश असून, उर्वरित तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींचे गुन्हेगारी स्वरूप पाहता या प्रकरणात 'संघटित गुन्हेगारी' (MCOCA सारखी वाढीव कलमे) लावण्यात आली आहेत. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल आणि अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उसळी, कांद्याने केली आजही निराशा, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

या कारवाईमुळे ग्रामीण भागातील शेतवस्तीवर राहणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

मराठी बातम्या/पुणे/
पिकअपमध्ये बसून यायचे अन् मध्यरात्रीच करायचे धक्कादायक कांड, पुण्यातील त्या 5 घटनांनंतर अखेर टोळीला अटक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल