TRENDING:

Shirur Loksabha Result 2024 : शरद पवारांचा अजितदादांना दणका, अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांना पाडलं मागे

Last Updated:

Shirur Loksabha Result 2024 : महाराष्ट्रात शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिरूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिले कल हाती येत आहेत. यामध्ये पहिल्या फेरीतील मतमोजणी झाली आहे. सुरुवातीला पोस्टल मतदान आणि त्यानंतर ईव्हीएम मशिनच्या मतमोजणीला सुरुवात करण्यात आलीय. महाराष्ट्रात शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. तर त्यांच्या विरोधात असलेले खासदार शिवाजीराव आढळकर हे पिछाडीवर असून हा अजित पवार यांना धक्क मानला. पहिल्या फेरी अखेर अमोल कोल्हे यांना ६११६ मतांची आघाडी मिळाली असून महायुतीचे शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.
अमोल कोल्हे, शिवाजी आढळराव
अमोल कोल्हे, शिवाजी आढळराव
advertisement

शिरूर लोकसभेचा घाट ते दिल्ली ही शर्यंत कोण जिंकणार?

अमोल कोल्हे सलग दुसऱ्यांदा खासदार होणार की शिवाजी आढळराव खासदारकीचा चौकार मारणार? यावरून तर्क-वितर्क लढवले जातायेत. अशातच गेल्या लोकसभेतील आणि यंदाच्या लोकसभेतील झालेली मतदानाच्या टक्केवारीवरून ही वेगवेगळे अंदाज बांधले जातायेत.

#शिरूर लोकसभेतील विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारी

विधानसभा 2024 2019

जुन्नर 58.16% 64.65%

advertisement

आंबेगाव 62.95% 70.13%

खेड-आळंदी 57.76% 62.20%

शिरूर 56.91% 61.45%

हडपसर 49.41% 57.45%

भोसरी 47.71% 47.84%

राज्यातील राजकारणाची घसरलेली पातळी. नेत्यांनी सोडलेली तत्व, निष्ठा आणि स्वाभिमान पाहून मतदारांचा राजकारण्यांवरील उडालेला विश्वास, सोबतचं शिरूर लोकसभेतील उन्हाचा तडाखा आणि अवकाळी पावसाचा व्यत्यय, यामुळं मतदानाची टक्केवारी घसरली. शिरुर लोकसभा मतदार संघात 2019 ला 60.62 टक्के मतदान झाल होत. ते 2024 ला 54.16 पर्यंत खाली आलं. म्हणजे थेट 6 टक्क्यांनी मतांची घसरण झाली. आता या ना त्या कारणाने मतदानाकडे पाठ फिरवणाऱ्या मतदारांचा फटका कोणाला बसणार यावरून चर्चांना उधाण आलंय.

advertisement

टक्का घसरला,फायदा कोणाला?

मतदानाचा टक्का घसरला की चिंता ही सत्ताधाऱ्यांची वाढते, असा आजवरचा अनेकांचा अभ्यास सांगतो. मागच्या वेळी कोल्हेंना निवडून आणणारी मंडळी यावेळी आढळराव यांचा प्रचार करत होती तर आढळरावांची ताकत असलेले पारंपारिक शिवसैनिक मात्र कोल्हेच्या बाजूने होते. त्यातच सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील अपघातामुळे मतदार संघात फिरले नाही. त्याचाही कोल्हे ना फायदा होईल. देशात आणि राज्यात असलेली मोदी विरोधी लाट यामुळे अमोल कोल्हे सलग दुसऱ्यांदा शिरूर लोकसभेचा घाट गाजवतील आणि दिल्लीत तुतारी फुंकतील, असं बहुतांश राजकीय अभ्यासकांचं मत आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Shirur Loksabha Result 2024 : शरद पवारांचा अजितदादांना दणका, अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांना पाडलं मागे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल