महिलेसोबत नेमके घडले काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,महिला तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी जात असताना डांगे चौक परिसरात अचानक दोन अज्ञात व्यक्ती समोर आले. या चोरट्यांपैकी एकाने स्वतःची ओळख अशी करून दिली की, ''माझ्या आयुष्यात आता 20 वर्षांनी मुलगा झाला आहे, मी वृद्ध लोकांच्या अंगावर शाल टाकून त्यांचे भविष्य सांगतो आणि घरातील अडचणीवर तोडगा काढतो'', या अशा नकली भविष्यवाण्याच्या बहाण्याने त्यांनी महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवले.
advertisement
डाव साधत केली चोरी
जसे महिला त्यांच्या बोलण्यात गुंतली होती, तसेच या दोघांनी चपळतेने तिच्या अंगावरील दागिने आणि महागडा मोबाईल फोन हातात घेवून पसार होण्याचे धाडस केले. महिलेकडून उघडकीस आलेल्या माहितीप्रमाणे, या दोघांनी मिळून एकूण 7 लाख 72 हजार रुपयांचे दागिने आणि मोबाईल ही चोरी केली आहे.
या घटनेने परिसरात दहशत पसरवली आहे.महिला या घटनेनंतर घाबरून गेली आणि तात्काळ वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. वाकड पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवला असून, दोन्ही अज्ञात चोरट्यांच्या शोधासाठी सखोल तपास सुरू केला आहे. या प्रकरणात पोलिस लोकांना विनंती करत आहेत की, अशा नकली भविष्यवाणी करणाऱ्यांकडे सावधगिरीने वागावे, अनोळखी लोकांकडे महागड्या दागिन्यांसह जाणे टाळावे आणि त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.
