TRENDING:

दिवसाढवळ्या कोयते घेत सोन्याच्या दुकानात घुसले, धडाधड काचा फोडल्या, हडपसरचा थरकाप उडवणारा Video

Last Updated:

पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून, त्यामध्ये तीन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजीत पोते, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातील शेवाळवाडी येथे कोयता गँगकडून सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मांजरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सहा आरोपींना अटक केली असून, त्यामध्ये तीन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. शेवाळवाडी गावातील रस्त्याच्या कडेला असलेल्या ‘महावीर ज्वेलर्स’ या सराफ दुकानात चार जण अचानक घुसले. त्यांच्या हातामध्ये धारदार कोयते होते. दुकानात त्या वेळी केवळ मालक एकटेच उपस्थित होते. दरोडेखोरांनी मालकाला कोयत्याचा धाक दाखवत आरडाओडा केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

advertisement

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद 

यानंतर आरोपींनी दुकानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने गोळा करण्यास सुरुवात केली. काही मिनिटांतच मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने लुटून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. हा संपूर्ण प्रकार दुकानात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यामध्ये हातात कोयते घेऊन दुकानात घुसणारे आरोपी स्पष्टपणे दिसत आहेत.

सहा आरोपींना अटक

advertisement

घटनेची माहिती मिळताच मांजरी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी काही तासांतच सहा आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रवीण महादेव शिंदे, राजदीप संतोष जगताप, भावेश राजेश चव्हाण यांच्यासह अन्य तीन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे.

advertisement

व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

या घटनेमुळे हडपसर व शेवाळवाडी परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिवसाढवळ्या अशा प्रकारचा दरोडा पडल्याने पोलिसांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, आरोपींकडून लुटलेले दागिने जप्त करण्यासाठी पोलिसांचा पुढील तपास सुरू असून, अल्पवयीन आरोपींना बाल न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा :

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लहान मुलांसाठी क्युट बॅग्स, 100 रुपयांत करा खरेदी,मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?
सर्व पहा

Crime : रात्रीची वेळ, तरुणाला विवस्त्र केलं अन्..., कात्रज कोंढवा रस्त्यावर भयंकर घडलं, पुण्यात खळबळ

मराठी बातम्या/पुणे/
दिवसाढवळ्या कोयते घेत सोन्याच्या दुकानात घुसले, धडाधड काचा फोडल्या, हडपसरचा थरकाप उडवणारा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल