महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा दर वर्षीच्या तुलनेत 10 दिवस लवकर घेतल्या. निकालही 15 मेपूर्वी जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार, बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर करण्यात आला. यंदाच्या दहावीच्या परीक्षेसाठी 23 हजार 492 माध्यमिक शाळांतून 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये आठ लाख 64 हजार 120 मुले, तर सात लाख 47 हजार 471 मुली आहेत. त्याचप्रमाणे 19 तृतीयपंथीयांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
advertisement
राज्याच्या निकाल किती?
राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के इतका लागला आहे. दहावीच्या निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागात 98.82 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर, सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला. नागपूर विभागात 90.78 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
राज्याच्या दहावीच्या परीक्षेत मुलींची कामगिरी सरस ठरली आहे. राज्यात 96.14 टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, 92.21 टक्के मुलं विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.
>> दहावीचा निकाल कसा पाहायचा? (Step-by-step Process For SSC Results)
1. निकालासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या
2. ‘SSC Examination Result 2025’ लिंकवर क्लिक करा
3. तुमचा Roll Number आणि आईचं नाव (Mother’s Name) टाका
4. ‘View Result’ बटणावर क्लिक करा.
>> इथं पाहा झटपट दहावीचा निकाल...
दहावीचा निकाल थेट इथं पाहता येईल.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. पुढील काही वेबसाईटवर निकाल पाहता येतील.
> https://results.digilocker.gov.in
> https://sscresult.mahahsscboard.in
> http://sscresult.mkcl.org
> https://results.targetpublications.org
> https://results.navneet.com