TRENDING:

'नमस्कार रसिकहो...' सवाई गंधर्व महोत्सवात 33 वर्षांच्या अखंड निवेदनाची 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंद

Last Updated:

अभिजात संगीताच्या विश्वात आजवर अनेक अविस्मरणीय क्षण निर्माण झाले आहेत. मात्र, अभिजात संगीताच्या मंचावर निवेदनाच्या माध्यमातून घडलेला हा विक्रम पहिल्यांदाच जागतिक पातळीवर नोंदवला गेला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: अभिजात संगीताच्या विश्वात आजवर अनेक अविस्मरणीय क्षण निर्माण झाले आहेत. मात्र, अभिजात संगीताच्या मंचावर निवेदनाच्या माध्यमातून घडलेला हा विक्रम पहिल्यांदाच जागतिक पातळीवर नोंदवला गेला आहे. तब्बल 71 वर्षांची परंपरा असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात सलग 33 वर्षे अखंड निवेदनाची सेवा बजावणारे ज्येष्ठ निवेदक आनंद देशमुख यांचा हा विक्रम इंग्लंडस्थित वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदवण्यात आला आहे. या अनोख्या कामगिरीबद्दल महोत्सवाच्या मुख्य मंचावर त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.
advertisement

अभिजात संगीताच्या प्रांतात हे निवेदन केवळ शब्दांचे सादरीकरण नसून, रसिक आणि कलाकार यांच्यातील संवेदनशील दुवा असतो. 33 वर्षांपूर्वी  पंडित भीमसेन जोशी यांनी आनंद देशमुख यांच्यावर दाखवलेला विश्वास आजही अखंडितपणे पुढे सुरू आहे. पंडितजींनी दिलेली जबाबदारी ही माझ्यासाठी केवळ काम नव्हे, तर एक साधना आहे, असे भावनिक शब्दांत आनंद देशमुख यांनी आपल्या प्रवासाची आठवण सांगितली. शास्त्रीय संगीताच्या निवेदनाची एक विशिष्ट चौकट असते. सुगम संगीताप्रमाणे येथे शेरो- शायरी, कविता किंवा किस्स्यांची रेलचेल करता येत नाही.

advertisement

राग, ताल, कलाकारांची माहिती आणि रसिकांची संवेदना यांचा अचूक समतोल राखावा लागतो. या मर्यादांमध्ये राहून निवेदन रसिकांना आवडावे, हे मोठे आव्हान असते. मात्र, हीच मर्यादा आपल्याला अधिक जबाबदार बनवते, असे देशमुख सांगतात. 33 वर्षांच्या प्रवासात अनेक कसोटीचे क्षण आले. वेळेची शिस्त, कलाकारांच्या गरजा, रसिकांची अपेक्षा आणि अभिजात संगीतातील गांभीर्य यांचा मेळ घालणे सोपे नव्हते. तरीही, हे सवाईचे आनंद आहे, असे कौतुक जेव्हा रसिकांकडून ऐकायला मिळते, तेव्हा सर्व कष्टाचे चीज झाल्याचे समाधान मिळते, असे त्यांनी सांगितले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krishi Market: कांद्यानं रडवलं, रविवारी मका अन् सोयाबीनला किती मिळाला भाव?
सर्व पहा

अभिजात संगीतातील हा निवेदनाचा विक्रम आता जागतिक व्यासपीठावर पोहोचला असून, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या गौरवशाली परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. रसिक, कलाकार आणि आयोजकांसाठी हा क्षण निश्चितच अभिमानास्पद ठरणारा आहे.

मराठी बातम्या/पुणे/
'नमस्कार रसिकहो...' सवाई गंधर्व महोत्सवात 33 वर्षांच्या अखंड निवेदनाची 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल