TRENDING:

गुन्हेगारांना माणसात आणणारा माणूस, उदय जगतापांच्या कामाचं होतंय प्रचंड कौतुक, पुण्यातल्या रिअल हिरोची खास गोष्ट

Last Updated:

आदर्श मित्रमंडळाचे उदय जगताप आणि त्यांचे सहकारी गुन्हेगारी कमी करण्यासाठी काम करत आहेत. बाहेर आलेला गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हा करू नये म्हणून त्यांना नोकरी मिळवून देतात ,त्यांनी 190 कुटुंबांना शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेतलं असून, गुन्हेगारीकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांचं समुपदेशनही केलं जातं

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: 2018 साली 'मुळशी पॅटर्न' चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यातून पुण्यातील गुन्हेगारीचं विदारक वास्तव समोर आलं. आजही गुन्हेगारीवर आधारित अनेक चित्रपट येतात, पण प्रश्न असा निर्माण होतो की अशा चित्रपटांमधील गुन्हेगार तरुणांना हिरो का वाटतात?एखादा गुन्हेगार जामिनावर बाहेर आला की त्याचं स्वागत धुमधडाक्यात होतं, वाढदिवस साजरे होतात आणि फ्लेक्स लागतात. या पार्श्वभूमीवर धनकवडीतील आदर्श मित्रमंडळाचे उदय जगताप आणि त्यांचे सहकारी गुन्हेगारी कमी करण्यासाठी काम करत आहेत.
advertisement

बाहेर आलेला गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हा करू नये म्हणून त्यांना नोकरी मिळवून देतात ,त्यांनी 190 कुटुंबांना शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेतलं असून, गुन्हेगारीकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांचं समुपदेशनही केलं जातं. त्याच्या याच कार्याविषयी उदय जगताप यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.

उदय जगताप यांनी सांगितलं की, शिक्षा पूर्ण करून सुटलेल्या आणि सुधारण्याची इच्छा असलेल्या कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यास मदत करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. किरकोळ गुन्हे किंवा जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या कैद्यांना नव्या आयुष्याची सुरुवात करता यावी, उदरनिर्वाहासाठी चांगली नोकरी मिळावी, यासाठी आदर्श मित्रमंडळ काम करत आहे. आदर्श मित्रमंडळाने पुण्यात सुरू केलेल्या दत्तवाडी पॅटर्नद्वारे शाळांमध्ये मुलांचे समुपदेशन केले जाते. तसेच, जेलमध्ये शुभम करोति कल्याणम, पसायदान आणि इतर समुपदेशक उपक्रमांमुळे गुन्हेगारीत मोठी घट झाली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

उदय जगताप यांनी सांगितले की, दत्तवाडीतील गुन्ह्यांची संख्या वर्षभरात 325 वरून 192 वर कमी झाली. पोलिसांनीही या पॅटर्नचे कौतुक केले असून, इतर पोलीस ठाण्यांमध्ये देखील हा पॅटर्न राबवण्यात येत आहे. पूर्वी हत्यारं, तलवारी किंवा कोयते हाताळणाऱ्या हातांनी आता व्यवसाय आणि कला असे तंत्र आत्मसात केले आहे. उदय जगताप यांनी सांगितले की, आदर्श मित्रमंडळाद्वारे गुन्हेगारांच्या 190. कुटुंबांना शैक्षणिक गोष्टीसाठी दत्तक घेतल गेलं आहे. तसेच, गुन्हेगारीकडे आकर्षित होणाऱ्या मुलांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि समुपदेशन केले जाते, ज्यामुळे स्थानिक स्तरावर गुन्हेगारीत लक्षणीय घट होण्यास मदत होते.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
गुन्हेगारांना माणसात आणणारा माणूस, उदय जगतापांच्या कामाचं होतंय प्रचंड कौतुक, पुण्यातल्या रिअल हिरोची खास गोष्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल