TRENDING:

UPSCने 15 वर्षातल्या 15 हजार जणांचा डेटा तपासला, एकटी Pooja Khedkar आढळली दोषी

Last Updated:

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरवर अखेर युपीएससीने कारवाई केली असून तिला दोषी ठरवलं आहे. तिची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : दिव्यांग प्रमाणपत्र, खोटी कागदपत्रे आणि वेगवेगळी नावे यामुळे वादात अडकलेल्या पूजा खेडकर यांच्यावर अखेर युपीएससीने कारवाई केलीय. पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली असून तिला युपीएससीच्या पुढील परीक्षासुद्धा देता येणार नाहीत. युपीएससीच्या तक्रारीवरून तिच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. तसंच युपीएससीने तिला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यालाही वेळेत उत्तर न दिल्यानं अखेर युपीएससीने तिच्यावर कारवाई केली.
News18
News18
advertisement

पूजा खेडकर प्रकरणी युपीएससीने कारवाईनंतर स्पष्टीकरण देताना सांगितलं की, युपीएससी 2022 च्या निकालानंतर पूजा खेडकर हिची प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, युपीएससीने पूजाला खोटी कागदपत्रे सादर करून मर्यादेपेक्षा जास्त वेळा परीक्षा दिल्याच्या आरोपा प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तिला या नोटीसीवर २५ जुलै पर्यंत यावर उत्तर द्यायचं होतं. मात्र तिने आणखी आठवड्याभराचा वेळ मागून घेतला.

advertisement

युपीएसीने पूजाला ३० जुलैपर्यंत वाढवून दिला तरीही नोटीसीला उत्तर दिले नाही. शेवटची संधी देऊनही उत्तर न दिल्यानं पूजा खेडकर हिच्यावर कारवाई करण्यात येईल असं युपीएससीने स्पष्ट केलं. पूजा खेडकरवर कारवाई करण्याआधी युपीएससीने सर्व रेकॉर्ड तपासले. त्यानंतर यामध्ये तिला नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी दोषी ठरवलं. तिची उमेदवारी तात्पुरती रद्द करण्यात आली असून तिला युपीएससीच्या भविष्यातील परीक्षेला बसता येणार नाही असंं युपीएससीकडून सांगण्यात आलंय.

advertisement

Pooja Khedkar : पूजा खेडकर दोषी, उमेदवारी रद्द; परीक्षेलाही बसता येणार नाही, युपीएससीची मोठी कारवाई

युपीएससीने 200९ ते २०२३ अशा १५ वर्षांचा डेटा तपासला. यामध्ये १५ हजार उमेदवारांच्या डेटाची तपासणी केली गेली. १५ हजार उमेदवारांमध्ये पूजा खेडकर वगळता इतर कोणत्याच उमेदवाराने सीएसई नियमानुसार परवानगीपेक्षा जास्त प्रयत्नांचा लाभ घेतल्याचं आढळलं नाहीय. पूजा खेडकर यांच्या प्रकरणात युपीएससीला तिच्या प्रयत्नांची नेमकी संख्या शोधता आली नाही. कारण तिने फक्त नावच नाही तर पालकांचं नावही अनेकदा बदललं. भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी युपीएससी योग्य खबरदारी घेणार असून यासंदर्भात लवकरच पावले उचलली जातील असं सांगण्यात आलंय.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

पूजा खेडकर प्रकरणात दिव्यांग प्रमाणपत्र किंवा खोट्या प्रमाणपत्राबाबत युपीएससीने सांगितलं की, आम्ही केवळ प्राथमिक पडताळणी करतो. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणपत्र दिलंय की नाही, प्रमाणपत्र जारी केल्याची तारीख, काही ओव्हररायटिंग आहे का, त्याचं स्वरुप इत्यादी बाबी पाहिल्या जातात. सर्वसाधारणपणे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याने जारी केलं असेल तर ते खरं मानलं जातं. युपीएससीकडे उमेदवारांनी सादर केलेली हजारो प्रमाणपत्रे तपासण्याचा आदेश किंवा तशी व्यवस्था नाही.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
UPSCने 15 वर्षातल्या 15 हजार जणांचा डेटा तपासला, एकटी Pooja Khedkar आढळली दोषी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल