Pooja Khedkar : पूजा खेडकर दोषी, उमेदवारी रद्द; परीक्षेलाही बसता येणार नाही, युपीएससीची मोठी कारवाई
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
युपीएससीने दुपारपर्यंत तिला म्हणणं मांडण्यास वेळ दिला होता. पण तिने काहीच प्रतिसाद न दिल्यानं आणि तिचे रेकॉर्ड तपासल्यानंतर पूजा खेडकरवर कारवाई केली.
दिल्ली : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिला युपीएससीने दोषी ठरवलं असून तिची उमेदवारी रद्द करण्यात आलीय. युपीएससीने तिला दोषी ठरवलं नसल्याचा मुद्दा बचाव पक्षाने मांडला होता. त्यानंतर युपीएससीने दुपारपर्यंत तिला म्हणणं मांडण्यास वेळ दिला होता. पण तिने काहीच प्रतिसाद न दिल्यानं आणि तिचे रेकॉर्ड तपासल्यानंतर पूजा खेडकरवर कारवाई केली. २००९ ते २०२३ या कालावधीतील १५ हजार उमेदवारांचे रेकॉर्ड तपासण्यात आले असून पूजा खेडकर वगळता कोणीही दोषी आढळलेलं नाही.
दिव्यांग प्रमाणपत्र आणि मर्यादेपेक्षा जास्त वेळा युपीएससी परीक्षा देण्यासाठी नावात बदल करण्यात आल्याचे तिच्यावर आरोप होते. पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. या सुनावणीत सरकारी वकिलांनी पूजाने कायम त्यांची भूमिका बदलली असून त्यांची कोठडीत चौकशी करण्याची गरज असल्याचा युक्तिवाद केला. न्यायालयाने यावर युपीएससीकडे रेकॉर्ड असल्याचं म्हटलं. तर युपीएससीने पूजाने पूर्ण व्यवस्थेसोबतच फ्रॉड केलं असल्याचा धक्कादायक खुलासा न्यायालयात केला.
advertisement
नागरी सेवा परीक्षा 2022 च्या निकालानंतर तिची प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, युपीएससीने पूजाला तिने खोटी कागदपत्रे सादर करून मर्यादेपेक्षा जास्त वेळा परीक्षा दिल्याच्या आरोपा प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तिला २५ जुलै पर्यंत यावर उत्तर द्यायचं होतं. पण याऐवजी तिने आणखी आठवड्याभराचा वेळ मागून घेतला.
युपीएसीने पूजा यांच्या विनंतीनंतर वेळ ३० जुलैपर्यंत वाढवून दिला होता. मात्र तरीही तिने उत्तर दिले नाही. शेवटची संधी देऊनही उत्तर न दिल्यानमं त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं युपीएससीने स्पष्ट केलंय. युपीएससीने सर्व रेकॉर्ड तपासल्यानंतर तिला नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी दोषी ठरवलं. तिची उमेदवारी तात्पुरती रद्द करण्यात आली असून तिला युपीएससीच्या भविष्यातील परीक्षेला बसता येणार नाही.
advertisement
पूजा यांच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर युपीएससीने जवळपास १५ वर्षांचा डेटा तपासला. यात १५ हजार उमेदवारांच्या डेटाची तपासणी केली गेली. त्यात पूजा खेडकर वगळता इतर कोणत्याच उमेदवाराने सीएसई नियमानुसार परवानगीपेक्षा जास्त प्रयत्नांचा लाभ घेतल्याचं आढळलं नाहीय. पूजा खेडकर यांच्या प्रकरणात युपीएससी तिच्या प्रयत्नांची नेमकी संख्या शोधू शकली नाही. कारण तिने फक्त नावच नाही तर पालकांचं नावही अनेकदा बदललं. भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी युपीएससी योग्य खबरदारी घेणार असून यासंदर्भात लवकरच पावले उचलली जातील असं सांगण्यात आलंय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 31, 2024 3:54 PM IST
मराठी बातम्या/देश/
Pooja Khedkar : पूजा खेडकर दोषी, उमेदवारी रद्द; परीक्षेलाही बसता येणार नाही, युपीएससीची मोठी कारवाई










