पुणे : शहरात टोळी युद्धातून झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणात आता पुणे पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली आंदेकर आणि कृष्णा आंदेकरची पत्नी प्रियंका आंदेकरला ताब्यात घेतले आहे. दुपारपासून त्यांची चौकशी सुरू आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईनंतर बंडू आंदेकरचं संपूर्ण कुटुंबच पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
advertisement
सोनाली आंदेकर हिच्यासोबत कृष्णा आंदेकर याच्या पत्नीला सुद्धा सोनाली सोबत नेल्याची माहिती आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या संपूर्ण आंदेकर कुटुंब पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. यापूर्वी कृष्णा आंदेकरने पोलिसांसमोर हजर झाला होता . वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली आंदेकर ही पुणे पोलिसांच्या रडारवर होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सोनाली आंदेकरला ताब्यात घेतलं आहे. पुढील कारवाई सुरु आहे.
पोलिसांकडून चौकशी सुरू
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार , सोनाली आंदेकर काही दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर होती. अखेर दुपारी पुणे क्राइम ब्रँचने सोनाली आणि प्रियंकाला आंदेकरला राहत्या घरातून ताब्यात घेतले. चौकशीसाठी नेण्यात आले असल्याची माहिती आहे. सध्या आंदेकर कुटुंबातील जवळपास सगळ्याच सदस्यांवर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
आंदेकरचं अख्खं कुटुंब जेलमध्ये?
1.बंडू आंदेकर - आयुषचे आजोबा
2.कृष्णा आंदेकर - आयुषचे मामा
3.शिवम आंदेकर- आयुषचे मामा
4.अभिषेक आंदेकर- आयुषचे मामा
5.शिवराज आंदेकर - आयुषचे मामा
6.लक्ष्मी आंदेकर- आयुषची आजी
7.तुषार वाडेकर - आयुषचा मावस भाऊ
8.स्वराज वाडेकर - आयुषचा मावस भाऊ
9.वृंदावनी वाडेकर- आयुषची मावशी
10. सोनाली आंदेकर - आयुषची मामी
11 . प्रियंका आंदेकर - आयुषची मामी
आयुष कोमकरच्या हत्येनंतर त्याच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीत सोनाली आंदेकरवर थेट आरोप करण्यात आला होता. आयुषच्या हत्येचा कट रचण्यात सोनाली आंदेकरचाही सहभाग होता. पोलिसांनाही त्याबाबत संशय होता आणि तपासादरम्यान पुरावे हाती लागताच पोलिसांनी तिच्यावर कारवाई केली.
पुणे पोलिसांनी कंबर कसली
पाच दशकाचा रंक्तरंजीत इतिहास असणाऱ्या आंदेकर टोळीला पुरतं संपवण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. या हत्या प्रकरणात ज्यांच्या ज्यांच्या संशय आहे अशा सर्वांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे.आंदेकर टोळीचे वर्चस्व गेल्या काही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. बाळू आंदेकर याच्यानंतर सूर्यकांत ऊर्फ बंडु आंदेकर याच्याकडे टोळीची सुत्रे आहेत.
हे ही वाचा :