Navratri 2025: नवरात्री आली जवळ, गरबा खेळताना जाऊ शकतो जीव? हे आधी लक्षात ठेवा, Video

Last Updated:

अनेकदा गरबा खेळताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची प्रकरणं समोर येतात. अशा घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

+
गरबा

गरबा खेळताना अटॅकचा धोका ? खेळायला जाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

पुणे: येत्या 22 सप्टेंबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. हे नऊ दिवस जल्लोषाने आणि आनंदाने भरलेले असतात. मात्र, या जल्लोषात गरबा खेळताना काही ठिकाणी दुर्दैवी घटना देखील घडतात. अनेकदा गरबा खेळताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची प्रकरणं समोर येतात. अशा घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे गरबा खेळायला जाण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? याबद्दल हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संजीव जाधव यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
गरबा खेळताना कोणती काळजी घ्यावी?
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संजीव जाधव यांनी सांगितले की, गरबा हा एक प्रकारचा व्यायाम आहे. त्यामुळे तो अचानकपणे न करता आधी थोडा सराव करणे गरजेचे आहे. नवरात्रीत गरबा खेळायचा असेल तर आरोग्य तपासणी करून घ्यावी. शरीरात काही त्रास किंवा आजार असल्यास गरबा टाळावा. तसेच डॉक्टरांचा सल्ला घेऊनच गरबा खेळण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
advertisement
तसेच गरबा खेळताना डीहायड्रेशन होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे गरबा खेळताना मोठ्या प्रमाणात घाम येतो आणि पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे गरबा खेळताना थोडा वेळ थांबून नियमितपणे पाणी किंवा द्रवपदार्थ घेत राहणे आवश्यक आहे. या नऊ दिवसांत अनेकजण उपवास करतात. उपवास करणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. रिकाम्या पोटी गरबा करू नये, काहीतरी खाऊन मगच गरबा करावा असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
advertisement
तसेच मधुमेह असलेल्या रुग्णांनी अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे. त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-जास्त होत राहते, त्यामुळे अचानक अटॅक येण्याची शक्यता असते. म्हणूनच अशा रुग्णांनी गरब्यापूर्वी सराव करून, योग्य काळजी घेऊनच सहभागी व्हावे. तसेच गरबा खेळताना मध्ये मध्ये थोडा ब्रेक घेणे अत्यावश्यक आहे. सतत तासंतास नाचल्याने शरीरावर ताण येतो, त्यामुळे थोड्या वेळ थांबून थांबून गरबा खेळण्याचा सल्ला डॉ. संजीव जाधव यांनी दिला आहे.
मराठी बातम्या/हेल्थ/
Navratri 2025: नवरात्री आली जवळ, गरबा खेळताना जाऊ शकतो जीव? हे आधी लक्षात ठेवा, Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement