आयुष कोमकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, मामी सोनाली आंदेकर पुणे पोलिसांच्या ताब्यात
- Published by:Prachi Amale
- Reported by:VAIBHAV SONAWANE
Last Updated:
Sonali Andekar : पाच दशकाचा रंक्तरंजीत इतिहास असणाऱ्या आंदेकर टोळीला पुरतं संपवण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे.
पुणे: आयुष कोमकर हत्या प्रकरणाने पुण्यातील टोळीयुद्ध पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंदेकरला अखेर अटक करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणात एकूण 13 आरोपी असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. कृष्णा आंदेकर नंतर आता वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जवळपास संपूर्ण आंदेकर फॅमिलीच पोलिसांच्या ताब्यात असून गँगस्टर बंडू आंदेकरच्या फॅमिलीचे साम्राज्यच आता धोक्यात आले आहे.
वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी भाचा आयुष कोमकरची हत्या केल्याचा पोलीसांना संशय आहे. या प्रकरणात पोलिसांनी बंडू आंदेकरसह अनेकांना अटक केली आहे. वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर हिचा देखील आयुष कोमकर हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय पुणे पोलिसांना आहे. त्यासाठी पुणे पोलीस हे सोनाली आंदेकर हिच्या मागावर होती. विविध पथके नेमून पोलीस फरार सोनाली आंदेकर हिचा शोध घेत होते. अखेर आज सोनाली आंदेकरला दुपारी नाना पेठ परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
advertisement
आतापर्यंत पोलिसांनी कोणा कोणाली केली अटक?
मुख्य आरोपी आणि आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर, अमन पठाण, यश पाटील, अमित पाटोळे, सुजल मिरगू आणि मुनाफ पठाणला देखील अटक केली आहे.
आंदेकर टोळीला संपवण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली
advertisement
पाच दशकाचा रंक्तरंजीत इतिहास असणाऱ्या आंदेकर टोळीला पुरतं संपवण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. या हत्या प्रकरणात ज्यांच्या ज्यांच्या संशय आहे अशा सर्वांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. यामध्ये आता आयुष कोमकर याची मामी आणि वनराजची पत्नी सोनाली आंदेकरसा सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतल्यानंतर आणखी काय खुलासा या प्रकरणात होतो हे पाहणे महत्वाचे आहे. आंदेकर टोळीचे वर्चस्व गेल्या काही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. बाळू आंदेकर याच्यानंतर सूर्यकांत ऊर्फ बंडु आंदेकर याच्याकडे टोळीची सुत्रे आहेत.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 18, 2025 2:59 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
आयुष कोमकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, मामी सोनाली आंदेकर पुणे पोलिसांच्या ताब्यात