'आज तब्बल 571 दिवसानंतर…'
काल मुंबईत सत्याचा मोर्चा पार पडला. मनसे आणि महाविकास आघाडीने एकाच मंचावर येत निवडणूक आयोगाविरुद्ध दंड थोपटले होते. त्यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर उपस्थित होते. राज ठाकरे यांनी मंचावरून दुबार मतदानाविरुद्ध गर्जना केली. त्यावेळी खाली बसून वसंत मोरे राज ठाकरेंचं भाषण ऐकत होते. त्यावेळी वसंत मोरेच्या कार्यकर्त्याने एक फोटो काढला. तो फोटो वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याला 'आज तब्बल 571 दिवसानंतर…' असं कॅप्शन वसंत मोरे यांनी दिलं आहे. त्यावरून राज ठाकरेंबद्दलचा त्यांचा स्नेहभाव दिसून येतो.
advertisement
राजीनामा देताना काय म्हटलं?
एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, आता आपली कुणाकडूनही काहीही अपेक्षा नाही अशी भावनिक पोस्ट वसंत मोरे यांनी मध्यरात्री फेसबुकवर केल्यानंतर वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातल्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे, असं वसंत मोरे यांनी राजीनामा देताना म्हटलं होतं.
राज ठाकरे आणि वसंत मोरे आमने सामने
दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरे यांच्याशी बोलून मी त्यांना दुखवू इच्छित नाही, असं वसंत मोरे म्हणाले होते. आगामी महापालिका निवडणुकीत वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. यावेळी राज ठाकरे पुण्यात सभा घेऊ शकतात. अशातच आता राज ठाकरे आणि वसंत मोरे कधी आमने सामने येणार? हे पाहणं महत्त्वाचं असेल.
