पुणे : संत नामदेव परमार्थातील समतावादी असून त्यांचा भक्तिमार्ग जाणते व नेणते अशा सर्वांकरिता आहे. इतर साधने व्यर्थ असून उत्कट भक्ती हेच परमार्थप्राप्तीचे एकमेव साधन होय, अशी त्यांची श्रद्धा होती. या अशा समतावादी संत नामदेव महाराजांच्या पादुका घेऊन राज्यासह पुण्यातील भाविकांनी मलेशियात मोठ्या उत्साहात हरी नामाचा गजर केला आहे.
महाराष्ट्रातील 60 भाविक संत नामदेव महाराजांच्या पादुका घेऊन मलेशियात गेले आहेत आणि त्याठिकाणी नामदेव महाराजांच्या पादुका पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. सातासमुद्रपार विठू नामाचा गजर अनुभवायला मिळाला. क्वालालंपूर येथील कार्तिक स्वामी मंदिरात नामदेव महाराजांचा जयजयकार हा डोळे दिपवणारा असा होता.
advertisement
श्रावणात घरी करायचंय शिवलिंग स्थापन? 4 गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर घडेल चूक
आयुष्याच्या राशीस काळाचे माप लागलेले असून हा देह क्षणाक्षणाला काळाच्या हाती जात आहे, हे ओळखून देह असतानाच हरिभक्ती करा आणि अंतीचा लाभ आधीच साधून घ्या, हे त्यांच्या पारमार्थिक शिकवणुकीचे सार आहे, अशी शिकवण संत नामदेव महाराजांनी दिली. अनेक भाविकांनी हरिपाठ, कीर्तनाद्वारे संत नामदेवांचे विचार मलेशियात व्यक्त केले. तसेच काही गायकांनी त्या ठिकाणी भजन देखील सादर केले.
भक्ती फाउंडेशनच्या वतीने हा विश्व भ्रमण दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भारतातून एकूण 60 भाविक या सोहळ्यात सहभागी झाले तर महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे, नाशिक, बारामती येथील भाविक दिंडीत सहभागी झाले आहेत.
Kolhapur News : कागलच्या कृत्रिम धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी, कसा आहे धबधबा?, VIDEO
तसेच मलेशियातील स्थानिक मराठी भाविकही दिंडीत सहभागी झाले असल्याचे पाहायला मिळाले. हा नयनदीप सोहळा भाविक भक्तांसाठी डोळ्यांची पारणे फेडणारा असा असल्याचे मत शांतिगिरी महाराज यांनी व्यक्त केले.