पुण्याच्या पर्वती परिसरामध्ये महात्मा फुले वसाहत येथे बोअरचे काम सुरू असताना पाईपलाईन फुटली आहे. काम सुरू असताना पाईपलाइन फुटल्यामुळे पुणेकरांची पुरती भांबारी उडाली आहे. यामुळे पुणे शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत (Pune Water Supply Disruption) होण्याचे चिन्ह अधिक आहे. दुपारी 4 ते संध्याकाळी 5 च्या दरम्यान पर्वती परिसरातील पाईपलाइन फुटली आहे. पाईपलाईन फुटल्यानंतर काही वेळामध्ये महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातल्या कर्मचाऱ्यांना कळवण्यात आलं होतं. त्यानंतर ते अनेक वेळेनंतर घटनास्थळी दाखल झाले. तेवढ्यावेळेत मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं आहे.
advertisement
पर्वती परिसरामध्ये बोअरचे काम सुरू असताना पाईपलाइन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे. पाईपलाईन फुटल्यावर रस्त्याला धरणाचं स्वरूप आलं होतं. धरणाप्रमाणेच रस्त्यावर पाणी होतं. पाऊस काही दिवस विश्रांती घेतो ना घेतो तेच रस्त्यावर पाईपलाइन फुटल्यामुळे पुणेकरांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. काही वेळेसाठी का होईना पाईपलाईन फुटली असली तरीही लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. त्यामुळे उपनगरांतील बहुतांश परिसरांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अद्याप पाणीपुरवठा बंद करण्यासंबंधितचे कोणतेही वृत्त समोर आलेलं नाही. परंतु जोपर्यंत पाईपलाईन दुरूस्त होत नाही, तोपर्यंत पाईपलाईन बंद असेल.