13 जानेवारीला पुणे येथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये धुक्यासह ढगाळ आकाश असणार आहे. पुढील काही दिवसांत पुण्यातील किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
साताऱ्यामध्ये 13 जानेवारीला कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. साताऱ्यात दुपारी किंवा सायंकाळी अंशतः ढगाळ आकाश राहणार आहे. पुढील काही दिवस साताऱ्यातील किमान तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे.
advertisement
मकर संक्रांतीसाठी खण फक्त 40 रुपयांपासून, पुण्यातील कुंभार वाड्यात करा खरेदी
सांगलीमधील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दुपारी किंवा सायंकाळी ढगाळ आकाश असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे.
सोलापूरमध्ये 13 जानेवारीला अंशतः ढगाळ आकाश राहणार असून तेथील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत सोलापूर मधील किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ होणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
कोल्हापूरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये दुपारी किंवा सायंकाळी अंशतः ढगाळ आकाश राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील किमान तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. किमान तापमानात वाढ झाली असली तरीही काही भागांत गारवा जाणवत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरण कायम असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.






