TRENDING:

उन्हाचा कडाका! कोल्हापुरात पारा चढला, पुण्यात काय स्थिती? पाहा हवामान अपडेट

Last Updated:

Western Maharashtra Weather update: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठे बदल होताना दिसत आहेत. विशेषतः कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत अधिक उष्णता जाणवेल. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठे बदल होताना दिसत आहेत. विदर्भामध्ये उन्हाचा पारा चढला असून आता पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात देखील सतत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये 3 फेब्रुवारी रोजी कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सियसपर्यंत इतके राहील तर किमान तापमान 12 ते 18 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. विशेषतः कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत अधिक उष्णता जाणवेल. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी.
News18
News18
advertisement

कोल्हापूर आणि साताऱ्यात उन्हाचा चटका अधिक जाणवण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात कमाल तापमान 35 अंश सेल्सियस राहील तर किमान तापमानात 14 अंशांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. साताऱ्यात कमाल तापमान 34 अंश सेल्सियस राहील तर किमान तापमान 14 अंश सेल्सियस असेल. सकाळी हवेमध्ये थोड्या प्रमाणात गारवा जाणवेल. मात्र दुपारनंतर उष्णता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

advertisement

पुणे शहर आणि जिल्ह्यात उन्हाचा प्रभाव अधिक जाणवेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुण्यात कमाल तापमान 34 अंश सेल्सियस राहील तर रात्रीच्या तापमानात 12 अंशांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. इथे दिवसभर उन्हाच्या झळा अधिक जाणवतील त्यामुळे नागरिकांनी अशावेळी पुरेसे द्रवपदार्थ प्यावेत आणि उन्हात फिरणे टाळावे.

सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात देखील उष्णतेचा अधिक प्रभाव राहील. सोलापुरात कमाल तापमान 36 अंश सेल्सियस तर किमान तापमान 18 अंशांपर्यंत राहील. सांगलीत तापमान 34 अंशांच्या आसपास राहील. या भागात हवेतील आर्द्रता तुलनेने कमी असल्यामुळे उन्हाचा तडाखा अधिक जाणवू शकतो. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीविषयक कामांचे नियोजन सावधगिरीने करावे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार 3 फेब्रुवारीनंतर काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन आपल्या पिकांचे संरक्षण करावे. वाढत्या तापमानामुळे उष्णतेच्या लाटेचा त्रास होऊ नये म्हणून नागरिकांनी हलके कपडे परिधान करावेत, पुरेसे पाणी प्यावे आणि शक्यतो दुपारच्यावेळी उन्हात घराबाहेर जाणे टाळावे.

मराठी बातम्या/पुणे/
उन्हाचा कडाका! कोल्हापुरात पारा चढला, पुण्यात काय स्थिती? पाहा हवामान अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल