TRENDING:

Pune: पुणेकर 'हेवी ड्रायव्हर' महिलेचा कहर, कारचं बोनेट पकडलेल्या तरुणाला 2 किमी नेलं फरफटत, VIDEO

Last Updated:

पुण्यात एका महिलेनं तर कहर केला आहे. कारचालक महिलेनं एका तरुणाला बोनेटवर बसवून तब्बल २ किमी फरफटत नेलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजीत पोते, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

पुणे : रस्ता असो की महामार्ग कारचालकांमध्ये वाद होण्याचा प्रकार नवा नाही. दुचाकीवाला कारचालकाला भांडतो आणि कारचालक ट्रकचालकाशी वाद घालतो, असे प्रकार सर्रास घडत असतात. अशातच आता पुण्यात एका महिलेनं तर कहर केला आहे. कारचालक महिलेनं एका तरुणाला बोनेटवर बसवून तब्बल २ किमी फरफटत नेलं. या अपघातात तरुणाच्या हाताला दुखापत झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार,   पुण्यातील संगमवाडी रस्त्यावर ही  थरारक घटना घडली आहे.  प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, एक महिला हुंदई i10 ही कार चालवत होती. रस्त्यावर एका इनोव्हा कारचालकासोबत या महिलेचा कुठल्या तरी कारणावरून वाद झाला. या वाद इतका विकोपाला गेला की, इनोव्हा चालकाने कार चालक महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला.

advertisement

कल्याणी नगरकडून येणाऱ्या चौकात इनोव्हा चालकाने गाडी आडवी लावली आणि महिलेची कार अडविण्याचा प्रयत्न केला. तो कार समोर थांबला असता महिलेनं कार तशीच दामटली. इनोव्हा चालक तरुणाने हुंदई i10 कारच्या बोनेटला पकडलं. बोनेटला पकडलेल्या अवस्थेत महिलेनं तरुणाला त्याच परिस्थितीत 2 KM फरफटत नेलं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात महागलेला शेवगा आता जागेवर आला, डाळिंबाचीही आवक वाढली, दर किती?
सर्व पहा

रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. २ किमी अंतर पार केल्यानंतर संतापलेल्या महिला कारचालकाने ब्रेक मारलं तसा तरुण रस्यावर येऊन पडला. त्याामुळे तरुणाच्या हाताला दुखापत झाली आहे. तरुण रस्त्यावर पडल्यानंतर कारचालक महिला घटनास्थळावरून फरार झाली.  या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी तरुणाने संगमवाडी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. या महिलेचा पोलीस शोध घेत आहे. मात्र, या दोघांमध्ये नेमका वाद कशामुळे झाला होता, याचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune: पुणेकर 'हेवी ड्रायव्हर' महिलेचा कहर, कारचं बोनेट पकडलेल्या तरुणाला 2 किमी नेलं फरफटत, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल