कात्रज-कोंढवा रोडवर नक्की काय घडलं?
पीडित तरुण हा वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो आणि कोंढवा परिसरात वास्तव्यास आहे. आरोपी हे त्याच्या ओळखीचे असून त्यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद निर्माण झाला होता. हा वाद अधिकच वाढल्याने 31 डिसेंबर रोजी आरोपींनी तरुणाला कारमधून जबरदस्तीने अपहरण केले.
रात्री सुमारे अकराच्या सुमारास आरोपींनी त्याला कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरातील मोकळ्या मैदानात नेले. तेथे त्याला विवस्त्र करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड करण्यात आला.
advertisement
यानंतर आरोपींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत शिवीगाळ केली. यावेळी मंगेश माने याने कारमध्ये ठेवलेल्या पिस्तुलाचा धाक दाखवला शिवाय पोलिसांकडे तक्रार जर दिली तर जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. इतकेच नव्हे तर तरुणावर गोळीबार केल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणी पीडित तरुणाने येवलेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आयुष कामठे, अभी म्हस्के, अभी पाटील, मंगेश माने, कौशल ऊर्फ ऋषी मोरे यांच्यासह एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या काही आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
