TRENDING:

मुंबईत घरविक्रीचा विक्रम! जानेवारी ते ऑगस्ट तब्बल इतक्या लोकांनी केली घराची नोंदणी

Last Updated:

Mumbai Real Estate: मुंबईत यंदा जानेवारी ते ऑगस्ट या काळात विक्रमी घरविक्री झाली आहे. तब्बल 99 हजारांहून अधिक मुंबईकरांनी घरांची नोंदणी केलीये.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मानली जाणारी मुंबई ही सर्वात मोठी आणि महागडी मालमत्तांची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. आता याच मुंबापुरीने सर्वाधिक घरविक्री करणारी बाजारपेठ अशी नवी ओळख निर्माण केलीये. यंदा जानेवारी ते ऑगस्ट 2025 या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या घरांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 8 महिन्यात तब्बल 99 हजारांहून अधिक घरांची नोंदणी झाली आहे.
Mumbai News: मुंबईत घरविक्रीचा रेकॉर्ड! जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान 99000 हून अधिक घरांची नोंदणी
Mumbai News: मुंबईत घरविक्रीचा रेकॉर्ड! जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान 99000 हून अधिक घरांची नोंदणी
advertisement

मुंबईत जानेवारी ते ऑगस्ट या काळात सर्वाधिक घरनोंदणी झाल्यामुळे मुद्रांक शुल्क संकलनाचा (स्टॅम्प ड्युटी) देखील विक्रम झाला आहे. 99 हजारांहून अधिक घरांची नोंदणी झाली असून लवकरच 1 लाखांचा टप्पा पार होणार आहे. विशेष म्हणजे मुंबईत सातत्याने घराच्या किमती वाढत असतानाच तसेच सरकारकडून रेडी रेकनरचे दर वाढवून प्रतिचौरस फुटाचे भाव देखील वाढवण्यात आले आहेत. अशा महागाईच्या काळात घरनोंदणीची आकडेवारी सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी ठरत आहे.

advertisement

DJ Noise Issue : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धुडकावला; विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या आवाजाने नागरिक त्रस्त

सरकारी महसुलात वाढ

सन 2024 मध्ये जानेवारी ते ऑगस्ट या काळात 96 हजार 497 घरांची नोंदणी झाली होती. यामध्ये यंदा 3 टक्क्याने वाढ झाली आहे. त्यामुळे मुद्रांक महसुलात 11 टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदा 31 ऑगस्टपर्यंत मुंबईत 99 हजार 869 घरांची नोंदणी झाली असून सरकारला 8854 कोटी रुपयांहून अधिक मुद्रांक महसूल मिळाला आहे.

advertisement

या घरांना सर्वाधिक मागणी

एकूण नोंदणीमध्ये घरांच्या नोंदणी 80 टक्के असून एक हजार चौरस फुटांच्या घरांना सर्वाधिक मागणी आहे. एक हजार ते दोन हजार चौरस फुट घरांच्या नोंदीचे प्रमाण 12 टक्के, तर 2 हजार फुटांहून अधिक किमतीच्या घरांच्या नोंदीचे प्रमाण 3 टक्के आहे. पाच कोटींहून अधिक किमतीच्या घरांच्या नोंदीचे प्रमाण 6 टक्क्यांवर आहे.

advertisement

मराठी बातम्या/रिअल इस्टेट/
मुंबईत घरविक्रीचा विक्रम! जानेवारी ते ऑगस्ट तब्बल इतक्या लोकांनी केली घराची नोंदणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल