देवघर : दरवर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी होते. यंदा मात्र 15 जानेवारीला हा सण साजरा केला जाईल आणि तेव्हापासूनच सण-उत्सवांची सुरुवात होईल. सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाल्यानंतर साजऱ्या होणाऱ्या या सणाच्या दिवशी दान करणं विशेष महत्त्वाचं मानलं जातं. शिवाय तीर्थस्थळी स्नान करणंही शुभ मानतात. घरात सुख, शांती आणि समाधानाचं वातावरण नांदावं यासाठी ज्योतिषांनी मकर संक्रांतीला करण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहेत.
advertisement
मकर संक्रांतीच्या दिवशी नदीत आंघोळ करून तीळ आणि गुळाचं दान केल्यास सर्व अडचणी नष्ट होतात असं मानलं जातं. शिवाय याच दिवसापासून मंगल कार्यांनाही सुरुवात होते. झारखंडच्या देवघरचे प्रख्यात ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार, लहानशी वस्तू का होईना, मात्र ती मकर संक्रांतीच्या दिवशी दान करावी. त्यामुळे आपल्याला पुण्य मिळतं. शिवाय आपल्या पापांआड दडलेलं आपलं भाग्यदेखील उजळतं. त्यामुळे या दिवशी नेमके काय खास उपाय करावे, पाहूया.
तिळाचं सेवन : संक्रांतीच्या दिवशी काळे तीन आवर्जून खावे. या तिळांमुळे आयुष्यातले सर्व दोष संपुष्टात येतात.
खिचडी खावी : या दिवशी पचायला सोपी आणि चवीला स्वादिष्ट अशी खिचडी खाल्ल्यास आयुष्यात आनंद येतो आणि सर्व आजारांपासून मुक्ती मिळते.
उत्तर दिशेत फेकावे काळे तीळ : मकर संक्रांतीला हातात थोडेसे काळे तीळ घ्या आणि उत्तर दिशेत फेका. त्यामुळे घरातली सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल.
सौभाग्याचं साहित्य करावं दान : या दिवशी सौभाग्यवती महिलांनी सौभाग्याचं साहित्य एखाद्या गरजू व्यक्तीला दान केल्यास नवऱ्याला त्याचा लाभ मिळतो. यामुळे नवऱ्याचं आयुष्य वाढतं.
साजूक तूप खावं : मकर संक्रांतीच्या दिवशी देशी तूप आवर्जून खावं. या तुपाचं दानही करावं. त्यामुळे आपल्या आयुष्यातील सुख, समृद्धीत वाढ होते.
तीळ आणि झाडूची करा खरेदी : या दिवशी तीळ आणि झाडू आवर्जून खरेदी करावी. यामुळे घरात सुख, समृद्धी नांदते. शिवाय नव्या झाडूसह घरात लक्ष्मी देवीचं आगमन होतं.
हवन करा : मकर संक्रांतीला मुलींनी घरात गायत्री मंत्र जपासह हवन करावं. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते .
सूर्याला जल अर्पण करा : मकर संक्रांतीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. त्यामुळे या दिवसाची सुरुवात सूर्याच्या पूजेने करावी. शिवाय सूर्याला जल अर्पण केल्यास सर्व आजारांपासून मुक्ती मिळते.
विशेष आंघोळ करावी : आंघोळ आपण दररोज करतो, परंतु मकर संक्रांतीच्या आंघोळीला खास महत्त्व आहे. आपल्या घराजवळ नदी असल्यास तिथेच आंघोळ करावी. अन्यथा घरातच पाण्यात काळे तीळ मिसळून आंघोळ करा. त्यामुळे शनीदेव प्रसन्न होऊन आयुष्यातील सर्व शनीदोष नष्ट होतात.
गायीला भाकरी चारावी : मकर संक्रांतीला गायीला भाकरी द्यावी. हे 33 कोटी देवतांची पूजा केल्यासमान मानलं जातं. त्यामुळे आपले सर्व पापही नष्ट होतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
