सामान्यतः काळा डाग हे चिंतेचे आणि दुःखाचे लक्षण असते आणि पांढरे डाग किंवा चिन्ह हे काही प्रमाणात शुभाचे लक्षण असते.
सौख्यासाठी वाहनांची जागाही असते महत्त्वाची, पार्किंग एरियाचे हे महत्त्वाचे नियम
1. अंगठ्याच्या नखावर चिन्ह
अंगठ्याच्या नखावर पांढरा डाग शुभ आणि काळा अशुभ असतो. पांढरा डाग नातेसंबंधात यश आणतो, तर काळा डाग वाढलेल्या आवेगाचे प्रतीक असल्याने, राग आणि गुन्हेगारी वाढण्याची शक्यता वाढते.
advertisement
2. तर्जनीवरील चिन्ह
तर्जनीच्या नखावर एक पांढरा डाग व्यवसायात नफा आणि आनंदाचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे काळा डाग हानिकारक आहे.
3. मध्यमाच्या नखावरील चिन्ह
मधल्या बोटाच्या नखावर पांढरे चिन्ह किंवा डाग हे प्रवासाचे लक्षण आहे. असे लोक भविष्यात लवकरच प्रवास करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, काळे चिन्ह काहीशी भीती प्रकट करते.
4. अनामिकावर चिन्ह
अनामिकेच्या नखावर पांढरे चिन्हदेखील शुभ आणि काळा अशुभ आहे. पांढरे चिन्ह आदर आणि संपत्तीची माहिती देते, तर काळा चिन्ह बदनामीचे सूचक आहे.
5. करंगळीच्या नखांवर डाग
करंगळीच्या नखावर एक काळा डाग नोकरी आणि व्यवसायातील अपयशाचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे पांढरे डाग यशाची माहिती देतात.
श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्यांचं काय आहे महत्त्व? वाचा काय आहे परंपरा आणि कारण
मऊ, गुळगुळीत आणि गुलाबी नखे चांगली
ज्योतिषींच्या मते गुलाबी, गुळगुळीत आणि मऊ नखं असणे हे शुभ लक्षण आहे. हे निरोगी व्यक्तीचे लक्षण आहेत, तर लांब आणि पातळ नखे शारीरिक कमजोरी दर्शवतात. वक्र आणि पट्टेदार नखे फुफ्फुसाच्या कमकुवतपणाचे लक्षण आहेत आणि लांब आणि जड नखे क्रूरता आणि निर्दयतेचे लक्षण आहेत. चकचकीत असलेली लांब नखे रक्तप्रवाहातील दोष दर्शवतात. लहान नखे हे चांगल्या बुद्धिमत्तेचे प्रतीक आहेत आणि रंगहीन नखे हे कोत्या मनाचे प्रतीक आहेत. अरुंद आणि वाकलेली नखे पाठीच्या कण्यातील रोगांची शक्यता दर्शवतात आणि लहान चौकोनी नखे हृदयरोग आणि पक्षाघाताचा धोका दर्शवतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)