पैठण येथे संत एकनाथ महाराजांनी सव्वा चारशे वर्षांपूर्वी एक वाडा बांधला होता, या वाड्यात त्यांचे संपूर्ण जीवन गेले. या ऐतिहासिक वाड्यात काही पुरातन वस्तू पाहायला मिळतात. या ऐतिहासिक वाड्यात सर्वात खास गोष्ट म्हणजे रांजण आणि दोन खांब आहेत. उद्धव खांब आणि पुराण खांब अशी त्यांची नावे आहेत. तर रांजणात संत एकनाथ महाराजांच्या घरी देवाने दहा वर्ष पाणी भरले, व पुराण खांबाला टेकून नाथ महाराज भागवत सांगायचे, असे रघुनाथ बुवा सांगतात.
advertisement
Ekadashi: निर्जला एकदाशी का महत्त्वाची? थेट भीमाशी कनेक्शन, उपवास सोडताना ही चूक नको!
देवाने नाथ महाराजांना दर्शन देऊन देव उद्धव खांबात गुप्त झाले, ही गोष्ट नाथांच्या भक्तीची आणि श्रद्धेची साक्ष देते, असे देखील येथील जाणकार सांगतात. 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी सेवा केल्यानंतर देव गुप्त झाल्याचे सांगितले जाते. हा वाडा केवळ जुनी इमारत नसून तो संत एकनाथांच्या भक्ती, ज्ञान आणि त्यांच्या दैवी अनुभवांचे ऐतिहासिक ठिकाण मानले जाते.
पैठण येथील वाड्यात असणाऱ्या वस्तू आणि खांब महान संतांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांशी जोडलेल्या आहेत. हा वाडा आपल्याला भूतकाळातील त्या पवित्र क्षणांची आठवण करून देतो. सध्या रघुनाथ बुवा पालखीवाले या वाड्याची सेवा करत आहेत.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)





