Ekadashi: निर्जला एकदाशी का महत्त्वाची? थेट भीमाशी कनेक्शन, उपवास सोडताना ही चूक नको!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Ekadashi Vrat: निर्जला एकादशी ही वर्षातील 24 एकादशींमधील सर्वाधिक पुण्यकारी मानली जाते. या दिवशी अन्न तर सोडाच, पण पाणीदेखील न घेता उपवास करण्याची परंपरा आहे.
मुंबई : आज, 6 जून रोजी निर्जला एकादशी मोठ्या भक्तिभावाने साजरी होत आहे. वर्षातील 24 एकादशींमधील सर्वाधिक पुण्यकारी एकादशी मानली जाणारी ही तिथी, 'निर्जला' या नावामुळे प्रसिद्ध आहे, कारण या दिवशी अन्न तर सोडाच, पण पाणीदेखील न घेता उपवास करण्याची परंपरा आहे. ही एकादशी ‘भीम एकादशी’ म्हणूनही ओळखली जाते, कारण पांडवांपैकी भीमसेन यांनी हीच एकमेव एकादशी पाळली होती.
या दिवशी श्रीविष्णूचे नामस्मरण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. 'ॐ नमो भगवते वासुदेवाय', 'श्री विष्णवे नमः', 'हरये नमः', 'गोविंदा गोविंदा' हे मंत्र सातत्याने जपावे. तुळसपत्र अर्पण करून ‘श्रीविष्णु सहस्त्रनाम’ किंवा ‘हरिनाम संकीर्तन’ करावे. तसंच या दिवशी लक्ष्मी-नारायण, श्रीकृष्ण किंवा रामचंद्र यांचेही स्मरण केल्यास विशेष पुण्य मिळते.
advertisement
व्रत संपूर्ण दिवसभर पाळावे. ज्यांची प्रकृती चांगली आहे, त्यांनी अन्न व जल वर्ज्य करून निर्जल उपवास करावा. काही भाविक तुळशीपत्राचे पाणी किंवा फळांचा रस घेऊन व्रत करतात. ज्यांना आरोग्याच्या कारणाने उपवास कठीण जातो, त्यांनी साखर-पाणी किंवा तांदूळ वर्ज्य करून फळाहार करावा.
पारण कसा करावा
दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 जून रोजी, द्वादशीला, सूर्योदयानंतर व ठरलेल्या पारण मुहूर्तात उपवास सोडावा.
advertisement
पारणचा योग्य वेळ: सकाळी 5:40 ते 8:30 यामध्ये पारण करणे शास्त्रसम्मत मानले जाते.
पारण करताना काय खावे
फळांचा रस, गोड पाणी किंवा लिंबूपाणी, मूगडाळ खिचडी (लसूण व कांदा वर्ज्य), तूपभात, साधं पातळ दाल, तुळशी पान टाकून केलेलं पाणी,
पारण करताना काय टाळावं
मांसाहार, कांदा, लसूण, मद्यपान, मिरची, लोणचं, खारट किंवा तीव्र पदार्थ, मसाल्याचे आणि तळलेले पदार्थ
advertisement
या दिवशी गरीबांना अन्नदान, जलदान, वस्त्रदान आणि धार्मिक ग्रंथांचे दान केल्याने अधिक पुण्य लाभते. निर्जला एकादशी म्हणजे केवळ उपवास नव्हे, तर मन, वाणी आणि कर्म यांचा संयम साधण्याचा दिवस आहे. या दिवशी सात्विकता, श्रद्धा आणि सेवा या त्रिसूत्रीचे पालन केल्यास मन:शांती आणि अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग सुकर होतो.
धार्मिक परंपरेप्रमाणे, ही एकादशी केवळ पुण्य मिळवण्यासाठी नव्हे, तर आत्मशुद्धी, साधना आणि भक्तिपथाला समर्पण करण्याचा दिवस मानावा, असे धर्मगुरू आणि शास्त्रकार सांगतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 06, 2025 12:46 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ekadashi: निर्जला एकदाशी का महत्त्वाची? थेट भीमाशी कनेक्शन, उपवास सोडताना ही चूक नको!

