नाथांच्या पालखी रथासाठी 120 किलो चांदी वापरण्यात आली आहे. यासाठी मजुरी 21 लाख रुपये आहे. यामध्ये 110 घनफूट सागवानी लाकूड वापरून त्यावर नक्षीकाम करून त्यावर 120 किलो शुद्ध चांदी चढवण्यात आली आहे. गोदाकाठी असलेल्या नाथांच्या पालखी ओटा येथून पालखी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान बुधवारी सायंकाळी सहा वाजता होईल. तत्पूर्वी नाथांच्या पालखी सोहळ्यातील पादुकांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.
advertisement
5 जुलैला नाथांची पालखी पंढरीत
नाथांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम पैठण हद्दीतील चनकवाडी या गावी राहणार आहे. त्यानंतर पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गस्थ होईल. दुसऱ्या दिवशी पालखी दिंडी सोहळा अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश करेल. 5 जुलै रोजी हा पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचणार आहे.
खासदार भुमरे यांच्या हस्ते रथाचे उद्घाटन
या रथाचे उद्घाटन छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे खासदार संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आलेले आहेत. यावेळी हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते. गेल्या बारा वर्षांपासून आमची इच्छा होते की नाथ महाराजांची पालखी चांदीचा रथातून पंढरपूरकडे जावे. बारा वर्षानंतर आमची इच्छा पूर्ण झालेली आहे. याचा मला खूप आनंद होत आहे, असं रघुनाथ महाराज म्हणाले.
दरम्यान, नाथांच्या पालखीची संपूर्ण तयारी झालेली आहे. वारकऱ्यांना रस्त्यामध्ये कुठलीच अडचणी यासाठी मी नितीन गडकरी यांना बोलणार आहे. तसेच इतरही सर्व अडचण दूर करणार आहे, असं खासदार संदिपान भुमरे म्हणाले.





