वासकर महाराज फडाची दिंडी ही केवळ वारीतील एक सहभाग नसून, ती वारी संस्कृतीचा एक वारसा आहे. या दिंडीचा सुरुवात 45 वर्षांपूर्वी झाली असली तरी, यामागे असलेली वारकरी भक्ती यापेक्षा अधिक वर्षांची आहे. वारी ही आमचं जीवन आहे, आमचं सौख्य नामस्मरणात आहे, असं वक्तव्य या फडाचे चोपदार दिनकर पाटील यांनी केलं.
advertisement
Ashadhi Wari 2025: जालना ते पंढरी सायकल वारी, 5000 वारकऱ्यांचं खास रिंगण, पाहा Video
आधी माणसं कमी...
पाटील पुढे सांगतात, सुरुवातीच्या काळात आमच्या दिंडीत फक्त 50-60 वारकरी होते, पण आज 300 हून अधिक भाविक या दिंडीत सहभागी होत आहेत. आधी माणसं कमी होती, पण ती सात्विक होती, एका तत्वाने चालणारी होती. वारीतून आम्हाला केवळ आध्यात्मिक समाधान नाही तर मानसिक, शारीरिक आणि ज्ञानाचेही समाधान मिळते.
हेच फडाच्या यशाचं गमक
पैशाने न मिळणाऱ्या समाधानाची अनुभूती या वारकरी प्रवासातून मिळते, हेच या वासकर फडाच्या यशाचं गमक आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या सोबतीने हे वारकरी दरवर्षी पंढरपूरच्या दिशेने चालताना आपल्या आयुष्यात भक्ती, शिस्त आणि साधेपणाचं उदाहरण घालून देतात. वारी ही फक्त परंपरा नाही, ती जीवनशैली आहे, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे वासकर फडाची ही 45 वर्षांची अखंड वारी आहे.