संत एकनाथ महाराज यांच्या पालखीसाठी यंदा चांदीचा रथ असणार आहे. ही पालखी पंढरीच्या वाटेने विविध ठिकाणी मुक्कामी असणार असून 5 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचणार आहे. श्री संत एकनाथ महाराज यांच्या सोहळ्याचा पहिला मुक्काम पैठण हद्दीतील चनकवाडी या गावी राहणार आहे. दुसऱ्या दिवशी पालखी दिंडी सोहळा अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश करेल. याच पालखी सोहळ्याचा मार्ग आणि रिंगण याबाबत जाणून घेऊ.
advertisement
Ashadhi Wari 2025: इच्छापूर्ती झाली...! नाथांच्या पालखीला चांदीचा रथ, आज पंढरीकडे प्रस्थान
असा असेल प्रवास (मुक्काम)
18 जून बुधवार – चनकवाडी,
19 जून गुरुवार - हदगाव,
20 जून शुक्रवार – कुंडलपारगाव,
21 जून शनिवार – मुंगसवाडे,
22 जून रविवार – राक्षसभुवन,
23 जून सोमवार – रायमोह,
24 जून मंगळवार - पाटोदा,
25 जून बुधवार – दिघोळ
26 जून गुरुवार - खर्डा,
27 जून शुक्रवार - दांडेगाव,
28 जून शनिवार - अनाळे,
29 जून रविवार -परांडा,
30 जून सोमवार -बिटरगाव,
1 जुलै मंगळवार - कुर्डू,
2 जुलै बुधवार - अरण,
3 जुलै गुरुवार – करकंब,
4 जुलै शुक्रवार – होळे,
5 जुलै शनिवार -पंढरपूर मुक्कामी पालखी पोहोचेल.
या ठिकाणी होणार रिंगण
श्री संत एकनाथ महाराजांचा पालखीचे पहिले रिंगण 21 जून म्हणजे शनिवारी मिडसांगवी या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर पालखीचे दुसरे रिंगण बुधवारी 25 जून रोजी पारगाव घुमरे या ठिकाणी होईल. तिसरे रंगणे शनिवारी म्हणजेच 28 जून रोजी नागरडोह या ठिकाणी होणार आहे. 1 जुलै रोजी चौथे रिंगण हे कव्हेदंड या ठिकाणी होईल. तर 5 जुलै रोजी उभे रिंगण आणि पादुका आरती पंढरपूरला होणार आहे.






