Ashadhi Wari 2025: इच्छापूर्ती झाली...! नाथांच्या पालखीला चांदीचा रथ, आज पंढरीकडे प्रस्थान

Last Updated:

Ashadhi Wari 2025: पैठणच्या संत एकनाथ महाराज यांच्या पादुका यंदा चांदीच्या पालखीतून पंढरीकडे जाणार आहेत. आज, 18 जून रोजी पालखीचे प्रस्थान होणार आहे.

+
Ashadhi

Ashadhi Wari 2025: इच्छापूर्ती झाली...! नाथांच्या पालखीला चांदीचा रथ, आज पंढरीकडे प्रस्थान

छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आपल्या सावळ्याला भेटण्यासाठी हजारो मैलांचा प्रवास करत पंढरपूर गाठतात. याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र पैठण (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या पायी दिंडीचे आषाढी एकादशीसाठी बुधवार 18 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
नाथांच्या पालखी रथासाठी 120 किलो चांदी वापरण्यात आली आहे. यासाठी मजुरी 21 लाख रुपये आहे. यामध्ये 110 घनफूट सागवानी लाकूड वापरून त्यावर नक्षीकाम करून त्यावर 120 किलो शुद्ध चांदी चढवण्यात आली आहे. गोदाकाठी असलेल्या नाथांच्या पालखी ओटा येथून पालखी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान बुधवारी सायंकाळी सहा वाजता होईल. तत्पूर्वी नाथांच्या पालखी सोहळ्यातील पादुकांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.
advertisement
5 जुलैला नाथांची पालखी पंढरीत
नाथांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम पैठण हद्दीतील चनकवाडी या गावी राहणार आहे. त्यानंतर पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गस्थ होईल. दुसऱ्या दिवशी पालखी दिंडी सोहळा अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश करेल. 5 जुलै रोजी हा पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचणार आहे.
advertisement
खासदार भुमरे यांच्या हस्ते रथाचे उद्घाटन
या रथाचे उद्घाटन छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे खासदार संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आलेले आहेत. यावेळी हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते. गेल्या बारा वर्षांपासून आमची इच्छा होते की नाथ महाराजांची पालखी चांदीचा रथातून पंढरपूरकडे जावे. बारा वर्षानंतर आमची इच्छा पूर्ण झालेली आहे. याचा मला खूप आनंद होत आहे, असं रघुनाथ महाराज म्हणाले.
advertisement
दरम्यान, नाथांच्या पालखीची संपूर्ण तयारी झालेली आहे. वारकऱ्यांना रस्त्यामध्ये कुठलीच अडचणी यासाठी मी नितीन गडकरी यांना बोलणार आहे. तसेच इतरही सर्व अडचण दूर करणार आहे, असं खासदार संदिपान भुमरे म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ashadhi Wari 2025: इच्छापूर्ती झाली...! नाथांच्या पालखीला चांदीचा रथ, आज पंढरीकडे प्रस्थान
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement