TRENDING:

astrology: या 4 राशींवर होणार धनवर्षा! येणार सुखाचे दिवस

Last Updated:

Rashi Bhavishya In Marathi: कसा असेल आजचा दिवस, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. पहा आजचं दैनिक राशीभविष्य

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मेष (Aries) : श्री गणेश सांगतात, आज तुम्हाला तुमचे हक्क जपावे लागतील. स्वतःचं संरक्षण करा. तुमच्या मित्र व कुटुंबियांसोबत वेळ घालवा, फायद्याचं ठरेल. तुमचे अनुभव आणि विचार त्यांच्यासोबत शेअर करा. यासाठी ही योग्य वेळ आहे. आज प्रवासाचा योग असून नवीन ठिकाणांना भेट देण्यासाठी वेळ मिळेल. प्रवासातून अनुभव मिळेल. वैयक्तिक जीवन सुधारण्यासाठी आज वेळ देऊ शकता. प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी उत्तम काळ आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून चांगली वेळ आहे. नवीन संधीचा फायदा घ्या. प्रेमाच्या बाबतीत दिवस आनंदात जाईल. जोडीदाराशी डिनर डेटवर जा, तुमचं नातं आणखी घट्ट होईल. आज तुम्हाला नातेसंबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टिनं एखादा प्लॅन करण्यास वेळ मिळेल.
News18
News18
advertisement

Lucky Colour : Black

Lucky Number : 1

वृषभ (Taurus) : श्री गणेश सांगतात, आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. पैसे मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार खर्च करता येईल. तुमचा कुटुंबातील सदस्यांना एखादी भेट वस्तू देऊ शकता, असं केल्यानं तुम्हाला देखील आनंद मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद व समाधान घेऊन येणारा आहे. आज तुम्ही तुमची ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिक दृष्टिकोनातून आज एखादा नवीन प्लॅन करू शकता. त्यासाठी योग्य वेळ असून तुमचा व्यवसाय मजबूत होण्यास देखील त्याची मदत होईल. आरोग्य उत्तम राहील. आरोग्यासंबंधी समस्या उद्भवणार नाही. एकंदरीत आजचा दिवस तुम्हाला आनंदात जाईल.

advertisement

Lucky Colour : Blue

Lucky Number : 9

मिथुन (Gemini) : श्री गणेश सांगतात, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आव्हानात्मक असेल. ऑफिसमध्ये काम करताना तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल, काळजी घ्या. आज तुमच्या दैनंदिन दिनचर्येवर देखील परिणाम होईल. कौटुंबिक व व्यावसायिक संबंधांवर विशेष लक्ष द्यावं लागेल. तुमच्यासाठी अनिश्चितता आणि अस्थिरता घेऊन येणारा आजचा दिवस असल्यानं सावध राहा. स्वतःच्या निर्णयाकडे लक्ष द्या. करिअरच्या दृष्टिनं, व्यवसायाच्या दृष्टिनं नवीन पर्याय शोधण्यासाठी उत्तम काळ आहे. जीवनाचा नवीन अध्याय सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. नवीन अनुभव मिळाल्यानं आनंद होईल. तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सक्रिय राहा, यश मिळेल.

advertisement

Lucky Colour : White

Lucky Number : 2

Golden Baba: 23 किलो सोने, 27 लाखांचे घड्याळ; हे 'गोल्डन बाबा' कोण होते?

कर्क (Cancer) : श्री गणेश सांगतात, आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आहे. ऑफिसमध्ये कोणतेही काम करताना ते उत्साहाच्या भरात करू नका, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. ऑफिसमध्ये काम वेळेवर पूर्ण करण्यास प्राधान्य द्या. तुमचे उत्पन्न आणि खर्च या दोन्हींचा ताळमेळ घालणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. कोणताही निर्णय हा विचारपूर्वक घ्या. अविवाहित व्यक्तीसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही लग्नासाठी एखाद्या व्यक्तीचा शोध घेत असाल तर आज कदाचित तुमचं नातं जुळू शकते. तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिनं वाटचाल होताना दिसल्यानं दिवस आनंदात जाईल. आज घरामध्ये एखादं शुभ कार्ये आयोजित करू शकता. आर्थिक स्थितीवर चांगली राहील, यासाठी खर्चावर नि नियंत्रण ठेवा. निष्काळजीपणा टाळा.

advertisement

Lucky Colour : Pink

Lucky Number : 6

सिंह (Leo) : श्री गणेश सांगतात, आजचा दिवस तुमच्यासाठी अपयशांनी भरलेला असेल. ऑफिसमध्ये काम करताना तुम्हाला अडचणी आल्यानं त्रास होऊ शकतो, काळजी घ्या. काम करताना संयम ठेवा. प्रतिस्पर्ध्यांपासून दूर राहा. स्वतःच्या कामात सक्रिय राहून ध्येय साध्य करण्यासाठी काम करा, फायद्याचं ठरेल. कुटुंब व मित्रांसोबत वेळ घालवा, त्यांच्यासोबत मनातील भावना शेअर करा, त्यासाठी योग्य वेळ आहे. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळाल्यानं कामात यश मिळेल. प्रत्येक काम आत्मविश्वासानं पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यानं फायदा होईल. दिवस आनंदात जाईल. यशाकडे वाटचाल कराल.

advertisement

Lucky Colour : Brown

Lucky Number : 3

कन्या (Virgo) : श्री गणेश सांगतात, आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ व आनंददायी आहे. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न वाढेल. बँकेतील बचत वाढेल. आज तुम्ही तुमच्या निर्णयांवर लक्ष केंद्रित करा. ऑफिसमध्ये काम करताना संयम ठेवा. आरोग्याच्या दृष्टिनं विश्रांतीला प्राधान्य द्या. ऑफिसमध्ये काम करताना स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करून ते काम चांगले व्हावे, यासाठी प्रयत्न करा, फायद्याचं ठरेल. आज तुम्हाला यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तुम्ही तुमचं ज्ञान इतरांसोबत शेअर करा, त्यासाठी योग्य वेळ आहे. आर्थिक बाबींमध्ये नफा मिळाल्यानं तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

Lucky Colour : Orange

Lucky Number : 4

तूळ (Libra) : श्री गणेश सांगतात, आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. कारण आज तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळेल. ऑफिसमध्ये काम करताना कोणतेही काम उत्साहात करू नका. अन्यथा गैरसमज होऊ शकतात. तुमचं काम वेळेवर पूर्ण करण्यास प्राधान्य द्या, फायद्याचं ठरेल. आज तुमचं एकूण उत्पन्न व होणारा खर्च या दोन्हींचा ताळमेळ बसवा. आज तुमच्या कल्पनांनी इतरांना प्रभावित करण्यासाठी प्रयत्न करू नये. अन्यथा नुकसान होऊ शकते. आज खर्चाची चिंता करू नका. तुमच्या मनाप्रमाणे खर्च करण्यासाठी आज उत्तम काळ आहे. मनाप्रमाणे खर्च केल्यानं आनंद मिळेल. एकंदरीत आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येणारा आहे. फक्त कोणतेही काम आत्मविश्वासानं करा. ध्येय साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा.

Lucky Colour : Maroon

Lucky Number : 8

वृश्चिक (Scorpio) : श्री गणेश सांगतात, आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकांसोबत वेळ घालवता आल्यानं छान वाटेल. आज कष्टाच्या व जिद्दीच्या जीवावर तुम्हाला यश मिळेल, फक्त योग्य संधीचा लाभ घ्या. पैशांची चणचण भासेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ आनंदात जाईल. फक्त शांत राहा. आरोग्याच्या दृष्टिनेही आजचा दिवस महत्त्वाचा आहे. ऑफिसमध्ये काम करीत असताना आरोग्याची काळजी घ्या, फायद्याचं ठरेल. ऑफिसमध्ये वेळेवर योग्य निर्णय घ्यावा लागू शकतो, अशा परिस्थितीसाठी तयार राहा. निरोगी राहण्यासाठी स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

Lucky Colour : Dark Green

Lucky Number : 14

धनू (Sagittarius) : श्री गणेश सांगतात, आजचा दिवस तुमच्यासाठी कामाच्या दृष्टिनं योग्य नाही. आज ऑफिसमध्ये काम करताना तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. कामावर लक्ष केंद्रित करून ते पूर्ण करा. कुटुंब व मित्रांसोबत वेळ घालवल्यानं दिवस आरामात जाईल. तुमच्यासाठी ते फायदेशीर ठरेल. आज तुमच्या आजूबाजूला असणारी परिस्थिती लक्षात घेऊन, संयम ठेवत तुमचं काम मार्गी लावणं फायद्याचं ठरेल. आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन शिकण्याची संधी घेऊन येणारा व अनुभव देणारा आहे. गुंतवणुकीबाबत सावध राहा. पैशांची बचत करण्याचा प्रयत्न करा. खर्चाबाबतही सावध राहा. आज आर्थिक बजेट सांभाळण्यास प्राधान्य द्या, फायद्याचं ठरेल.

Lucky Colour : Red

Lucky Number : 5

Ganesh Chaturthi 2024: अष्टविनायकाच्या 8 गणपतींचा हा आहे इतिहास! तुम्हाला माहिती आहे का?

मकर (Capricorn) : श्री गणेश सांगतात, आजचा दिवस तुमच्यासाठी व्यावसायिक दृष्टिकोनातून भरभराटीचा आहे. कारण आज तुम्हाला व्यवसाय क्षेत्रात चांगला नफा मिळेल. नवीन संधी मिळतील. आवश्यक व्यावसायिक कामे मार्गी लागतील. पण व्यवसायात आज एखाद्या नवीन प्लॅननुसार बदल करू नका. त्यासाठी ही योग्य वेळ नाही. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न व खर्च या दोन्हींचा ताळमेळ ठेवा, फायद्याचं ठरेल. प्रेमाच्या बाबतीत जोडीदारासोबत आजची सायंकाळ आनंदात जाईल. ऑफिसमध्ये काम करताना कष्ट व जिद्द कायम ठेवा, फायद्याचं ठरेल. मित्रांकडून मदत घेऊ नका. त्यासाठी योग्य वेळ नाही. कुटुंबातील सदस्यांसोबत, तुमच्या इतर ओळखींच्या व्यक्तींसोबत आज संवाद साधताना तुमच्या कल्पना शेअर करू शकता. त्यासाठी सध्याची वेळ अनुकूल आहे.

Lucky Colour : Yellow

Lucky Number : 10

कुंभ (Aquarius) : श्री गणेश सांगतात, आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आहे. व्यवसायासाठी नवीन संधी शोधावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. दिवसभर आनंदाचे वातावरण राहावे, यासाठी तुमच्या नातेवाईकांना, कुटुंबियांना वेळ द्या. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कष्ट करावे लागतील. व्यवसायात यश मिळावे, प्रगती व्हावी, यासाठी तुम्हाला नवीन प्लॅन तयार करून ते अंमलात आणावे लागतील. आज तुमचं आर्थिक उत्पन्न मात्र वाढेल. बँकेच्या बचतीत वाढ होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. ऑफिसमध्ये काम करताना तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटावा, असं काम केल्यानं आनंद होईल. व्यवसायात यश मिळविण्यासाठी कष्टाला प्राधान्य द्या. आजचा दिवस प्रेमाच्या दृष्टिनं अनुकूल आहे.

Lucky Colour : Green

Lucky Number : 13

मीन (Pisces) : श्री गणेश सांगतात, आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो, परंतु तुम्ही संयम बाळगून यश मिळवाल. तुमच्या आवडत्या छंदासाठी थोडा वेळ द्या, शांतता मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना आज त्यांच्या अभ्यासातून थोडा वेळ काढून स्वतःचा छंद जोपासण्याच प्राधान्य देणं फायद्याचं ठरेल. आरोग्याची काळजी घ्या. ऑफिसमध्ये तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, यश मिळेल. नवीन गोष्टींचे ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज तुमचं ज्ञान इतरांसोबत शेअर करू शकता, त्यासाठी योग्य वेळ आहे. आर्थिक बाबींमध्ये नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

Lucky Colour : Sky Blue

Lucky Number : 7

मराठी बातम्या/अध्यात्म/
astrology: या 4 राशींवर होणार धनवर्षा! येणार सुखाचे दिवस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल