भाद्रपद पौर्णिमा 2023 -
वैदिक दिनदर्शिकेनुसार, भाद्रपद पौर्णिमेची तिथी गुरुवार, 28 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 06:49 वाजता सुरू होत आहे आणि ही तिथी शनिवार, 29 सप्टेंबर रोजी दुपारी 03:26 पर्यंत वैध असेल.
भाद्रपद पौर्णिमा व्रत -
पंचांग आधारित पौर्णिमा तिथीनुसार भाद्रपद पौर्णिमेचे व्रत गुरुवार, 28 सप्टेंबर रोजी केले जाईल, कारण पौर्णिमा तिथीचा चंद्रोदय 28 सप्टेंबरला आहे, तर 29 सप्टेंबरला चंद्रोदय अश्विन प्रतिपदा तिथीला होईल. 28 सप्टेंबर रोजी चंद्रोदय संध्याकाळी 05:42 वाजता होईल.
advertisement
भाद्रपद पौर्णिमा 2023 चे स्नान दान कधी?
भाद्रपद पौर्णिमेला स्नान व दान शुक्रवार, 29 सप्टेंबर रोजी होणार असल्याने स्नान व दानासाठी उदयतिथी मानली जाते. उदयतिथीनुसार भाद्रपद पौर्णिमा 29 सप्टेंबरला आहे. या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी 06:16 वाजता होईल.
अन्यथा भाडेकरूच बनेल मालक! घर भाड्यानं देण्यापूर्वी हे वास्तू नियम लक्षात ठेवा
रवि योग -
यावेळी भाद्रपद पौर्णिमा व्रत रवि योगात आहे. या दिवशी सकाळी 06.12 पासून रवियोग सुरू होत असून तो रात्री 01.48 पर्यंत राहील. या दिवशी पंचक संपूर्ण दिवस आहे. भाद्रपद पौर्णिमा व्रताच्या दिवशी, भद्रकाळ संध्याकाळी 06.49 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 05.06 पर्यंत आहे.
भाद्रपद पौर्णिमा 2023 चंद्र अर्घ्य वेळ -
28 सप्टेंबर रोजी चंद्राच्या पूजेनंतर अर्घ्य दिले जाईल. त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी 05:42 पासून चंद्राला अर्घ्य देऊ शकता. अर्घ्य देताना चंद्रदेवाला कच्चे दूध, पाणी, पांढरी फुले व अक्षत अर्पण करावे.
भाद्रपद पौर्णिमेला सर्वार्थ सिद्धीसह 2 शुभ योग -
भाद्रपद पौर्णिमेच्या स्नानाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग तयार होत आहेत. मात्र, हे दोन्ही योग रात्री तयार होत आहेत. अमृत-सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग रात्री 11:18 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 06:13 पर्यंत चालेल. भाद्रपद पौर्णिमा स्नानाच्या दिवशी पंचक आहे.
पितृपक्षात कावळा अशा पद्धतीनं देतो शुभ-अशुभ संकेत, पूर्वज अतृप्त असतील तर..?
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)