Vastu Tips: अन्यथा भाडेकरूच बनेल मालक! घर भाड्यानं देण्यापूर्वी हे वास्तू नियम लक्षात ठेवा

Last Updated:

Vastu Tips For House Owner : काहींना घर भाड्यानं दिल्यानंतर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. एकतर भाडेकरू वेळेवर भाडे देत नाही किंवा भाडेकरू जास्त काळ त्या घरात राहत नाहीत. वास्तूदोष हे देखील यामागे एक प्रमुख कारण असू शकते.

घर भाड्यानं देण्याचे वास्तुशास्त्र
घर भाड्यानं देण्याचे वास्तुशास्त्र
मुंबई, 27 सप्टेंबर : एकापेक्षा जास्त घरं असतील तर लोक अशी घरे भाड्यानं देतात. त्यामुळे घर रिकामं राहत नाही आणि अतिरिक्त उत्पन्नही मिळू लागतं. पण, चांगल्या हेतूने भाड्याने घर देऊनही अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. एकतर भाडेकरू वेळेवर भाडे देत नाही किंवा भाडेकरू जास्त काळ त्या घरात राहत नाहीत. वास्तूदोष हे देखील यामागे एक प्रमुख कारण असू शकते. अशा समस्या टाळण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत, ज्याचा अवलंब केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. ते उपाय काय आहेत, याविषयी ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
मुख्य दरवाजाची विशेष काळजी घ्या -
वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. मुख्य दरवाजाद्वारे सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. घराचा मुख्य दरवाजाला वेळोवेळी रंग द्या आणि त्यावर तोरणही बांधा. असं केल्यानं घरमालक आणि भाडेकरू यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध राखले जातात.
या गोष्टी ताबडतोब काढा -
वास्तुशास्त्रानुसार भाड्याने घर देण्यापूर्वी तुटलेल्या-फुटलेल्या गोष्टी दुरुस्त करा किंवा त्या ताबडतोब काढून टाका. या खराब झालेल्या गोष्टी घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात. घरात भाडेकरू राहणार आहेत, म्हणून तेथे कोणत्याही प्रकारची रद्दी किंवा तुटलेल्या वस्तू ठेवू नका.
advertisement
नळाची विशेष काळजी घ्या -
वास्तुशास्त्रानुसार भाड्याने घर देण्यापूर्वी घरातील प्रत्येक नळ नीट तपासा. कोणताही नळ गळत नाही याची खात्री करा. नळातून पाणी टपकत असेल तर भाड्याने राहायला आलेल्या व्यक्तीला आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. त्याला व्यवसाय आणि नोकरीतही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
घराचा हा भाग भाड्याने देऊ नये -
वास्तुशास्त्रानुसार, तुम्ही राहत असलेल्या घरातील काही भाग भाड्यानं द्यायचा असेल तर चुकूनही दक्षिण-पश्चिम भाग भाड्याने देऊ नका. असे केल्याने भाडेकरूच मालक बनण्याची शक्यता बर्‍याच प्रमाणात वाढते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu Tips: अन्यथा भाडेकरूच बनेल मालक! घर भाड्यानं देण्यापूर्वी हे वास्तू नियम लक्षात ठेवा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement