PitruPaksha: पितृपक्षात कावळा अशा पद्धतीनं देतो शुभ-अशुभ संकेत, पूर्वज अतृप्त असतील तर..?

Last Updated:

PitruPaksha 2023: यंदा 29 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होत आहे. या काळात बहुतेक लोक आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांचा आत्मा तृप्त करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतात. शास्त्रानुसार पितृपक्षात कावळ्यांना विशेष महत्त्व आहे.

पितृपक्षात कावळ्याचे संकेत
पितृपक्षात कावळ्याचे संकेत
मुंबई, 22 सप्टेंबर : हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे, यंदा 29 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होत आहे. या काळात बहुतेक लोक आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांचा आत्मा तृप्त करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतात. शास्त्रानुसार पितृपक्षात कावळ्यांना विशेष महत्त्व आहे. कावळा हा आपल्या पूर्वजांचे प्रतीक मानला जातो. पितृपक्षात कावळ्यांकडून काही शुभ आणि अशुभ संकेत मिळतात, असे मानले जाते. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
घराच्या छतावर ओरडणे -
पितृपक्षात घराच्या छतावर कावळा सतत येऊन आरडा-ओरडत करत असेल, तर ते अशुभ मानले जाते. याचा घरात काही मोठे संकट येऊ शकते.
घरासमोर बसणे - सूर्योदयाच्या वेळी तुमच्या घरासमोर पूर्व दिशेला कावळा बसला तर तो शुभ संकेत मानला जातो. यशस्वी होण्याचे ते लक्षण मानले जाते.
डोक्याला स्पर्श करून जाणं - पितृपक्षाच्या काळात कावळा डोक्याला स्पर्श करून जात असेल तर ते शकुन शास्त्रामध्ये अशुभ मानले जाते. यामुळे मृत्यू किंवा घातक काही तरी घडण्याचा संकेत मानला जातो.
advertisement
पायानं माती काढणं - घराच्या परिसरात एखादा कावळा येऊन पायानं माती खोदताना दिसला तर ते आर्थिक लाभाचे लक्षण मानले जाते. तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते.
सुकलेल्या झाडावर बसणं - पितृपक्षात सुकलेल्या झाडावर बसलेला कावळा पाहणं हे घरातील दारिद्र्य किंवा कुटुंबातील कलहाचे प्रतीक मानले जाते.
advertisement
पायांना स्पर्श करणं - या काळात कावळा तुमच्या पायांना स्पर्श करून निघून जाणं शुभ मानले जाते, ज्यामुळे तुम्हाला समाजात सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते.
चोचीत तुकडा घेऊन जाताना दिसणं - पितृपक्षाच्या काळात कावळा चोचीत काही तरी घेऊन निघाल्याचे दिसणं घरात धनधान्य आणि धनसंपत्तीचे लक्षण मानले जाते.
पाणी पिताना दिसणं - कावळा पाणी पिताना दिसला तर हे कामातील अडथळे दूर होण्याचे आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होण्याचे लक्षण आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
PitruPaksha: पितृपक्षात कावळा अशा पद्धतीनं देतो शुभ-अशुभ संकेत, पूर्वज अतृप्त असतील तर..?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement